अवघ्या चार महिन्यात टरबूज बीज उत्पादनातून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:59 PM2018-05-04T15:59:08+5:302018-05-04T15:59:08+5:30

मंठा तालुक्यातील तळणी येथे पाच शेतक-यांनी टरबुज बीज उत्पादनातून अवघ्या चार महिन्यांत लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.परिसरातील शेतकऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

The yields of lakhs of watermelon seeds produced in just four months | अवघ्या चार महिन्यात टरबूज बीज उत्पादनातून मिळवले लाखोंचे उत्पन्न

अवघ्या चार महिन्यात टरबूज बीज उत्पादनातून मिळवले लाखोंचे उत्पन्न

Next

जालना : मंठा तालुक्यातील तळणी येथे पाच शेतक-यांनी टरबुज बीज उत्पादनातून अवघ्या चार महिन्यांत लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.परिसरातील शेतकऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

शेतकरी  येथील शिवाजी गुजर, अशोक खरात, शिवाजी सरकटे, अरुण सरकटे व विकास सरकटे यांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये एका खाजगी कंपनीकडून रोपे, मर्चिग, ग्रीननेट मिळवत अर्ध्या एकरात टरबुजाची लागवड केली. टरबुज लावगडीपासून ते बीजउत्पादन होईपर्यंत कंपनीकडून शेतकऱ्यांना  मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना लावगडीपासून ते   बीजउत्पादनापर्यंत ३० ते ४० हजारांचा खर्च  आला. योग्य संगोपन केल्याने  . शेतकऱ्यांना चार महिन्यांत दिड ते दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळाल्याचे  शेतकरी शिवाजी गुजर यांनी सांगितले. मार्चमध्ये अवकाळी पाऊस झाला. जवळपास ५०० ते १ हजार टरबुज फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी विकास सरकटे  यांनी सांगितले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याने फळउत्पादक  शेतकऱ्यात संताप आहे.

ग्रामीण शेतकरी वळला शेडनेटकडे ... 
तळणीसह कोकंरबा , उस्वद व वडगाव सरहद येथील शेतकऱ्यांनी नैर्सगिक आपत्तीला न डगमगता  शेडनेटव्दारे शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. यामध्ये टोमॅटो मिर्ची, टरबुज, काकडी आदींचे बीजउत्पादन घेण्याकडे शेतक-यांचा कल दिसून येत आहे. तळणीसह परिसरातील गावात ५०  ते ५५ शेडनेटमधून बीजउत्पादन शेतकरी लाखोंचे उत्पन्न मिळवित असल्याचे उस्वदचे राम चट्टे व कोकंरबा येथील डिगाबर इक्कर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

Web Title: The yields of lakhs of watermelon seeds produced in just four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.