बनावट खतांचा कारखाना उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:18 AM2019-05-05T00:18:34+5:302019-05-05T00:18:46+5:30

: कृषी अधीक्षक तसेच त्यांचे सहकारी हे शुक्रवारी अचानक राजलक्ष्मी कारखान्यात तपासणीसाठी गेले असता, तेथे चक्क सेंद्रिय खताचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.

Textile fertilizer factory exposed | बनावट खतांचा कारखाना उघडकीस

बनावट खतांचा कारखाना उघडकीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कृषी अधीक्षक तसेच त्यांचे सहकारी हे शुक्रवारी अचानक राजलक्ष्मी कारखान्यात तपासणीसाठी गेले असता, तेथे चक्क सेंद्रिय खताचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे तसेच अन्य अधिकाऱ्यांनी हा बनावट खतांचा कारखाना उघडकीस आणून शेतक-यांची होणारी फसणूक थांबवली आहे.
हा कारखाना नांदेड येथील एका बड्या उद्योजकाचा असल्याचे सांगण्यात आले. २४ तास उलटल्यावरही या प्रकरणातील नेमका मालक कोण हे ना कृषी विभागाला कळले ना, पोलिसांना, विशेष म्हणजे कृृषी खात्याच्या गुणव्ता नियंत्रण विभागाकडे संबंधित कारखाना कोणाच्या नावाने चालतो याची सविस्तर माहिती असते, असे असताना गुन्हा नोंदविताना तो अज्ञात आरोपीविरूध्द नोंदवण्यात आल्याने देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बाबत पोलीसांकडूनही रितसर माहिती मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या भावानांशी हा सर्व खेळ सुरू असतांना यंत्रणांना कारखाना कोण चालवत होते, त्या बनावट सेंद्रिय खत निर्मितीसाठी कच्चा माल कुठून येत होता, त्याचे पुरवठादार कोण हे समजू शकले नाही.
दरम्यान, गुंडेवाडी येथील बनावट कारखान्यामध्ये जहाज या मुंबई येथील नामांकित ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट खत विक्री केली जात होती. विशेष म्हणजे सेंद्रीय खताच्या नावाखाली काजूची अर्क काढलेली टरफले, झेंडूच्या झाडाचा भुसा आदी साहित्य वापरले जात होते. तसेच एक आयुर्वेदिक भुकटीही कृषी खात्याने जप्त केली आहे. या खताच्या वापरामुळे पिकांची वाढ गती होऊन त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु कृषी खात्यातील अधिका-यांच्या म्हणण्यानुसार अशा साहित्यामुळे कुठलीच सुरक्षा मिळणे शक्य नसते.
मोक्का लावण्याची गरज
एकूणच खत उत्पादक उद्योजकाने यापूर्वी अशा किती बनावट खताची विक्री करून शेतकºयांच्या डोळ्यात धूळफेक केली अशी एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संदर्भात कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही गुन्हा नोंद केला आहे, आरोपी कोण त्याने हा गोरखधंदा कसा चालविला हा तपासाचा भाग असल्याचे सांगितले.
- भीमराव डोंगरे, काँग्रेस नेते

Web Title: Textile fertilizer factory exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.