जालन्यात टेम्पो उलटून २५ व-हाडी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:39 AM2018-10-23T00:39:03+5:302018-10-23T00:39:24+5:30

जाफराबाद तालुक्यातील पापळ या गावात लग्न लावून व-हाडी टेम्पो घनसावंगी तालुक्यातील रवना या गावाकडे जात असतांना पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने टेम्पोला जोराची धडक दिली. यात टेम्पो पलटी झाल्याने पंचवीस जण जखमी झाल्याची घटना नाव्हा रस्त्यावरील दत्त आश्रमाजवळ सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

Tempo recovers in Jalna, and injures 25-bone | जालन्यात टेम्पो उलटून २५ व-हाडी जखमी

जालन्यात टेम्पो उलटून २५ व-हाडी जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जाफराबाद तालुक्यातील पापळ या गावात लग्न लावून व-हाडी टेम्पो घनसावंगी तालुक्यातील रवना या गावाकडे जात असतांना पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने टेम्पोला जोराची धडक दिली. यात टेम्पो पलटी झाल्याने पंचवीस जण जखमी झाल्याची घटना नाव्हा रस्त्यावरील दत्त आश्रमाजवळ सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे.
या अपघातात रामकुंवर बरडे (६०, रा. रवना परंडा ), मंगल वाघ (३६, रवना पवना परंडा), रानुबाई बरडे, (६५, रा. हिवडी, ता.जि. जालना), पंचकुला बरडे (३५, हिवडी, ता. जि. जालना ), कविता (१९), उत्तम बरडे (७०), मंगल गांगुर्डे (४०, रा. रवना), रामा बरडे (२५, रा. हिवर्डी), कुंतला बरडे (२३), भिवसन वाघ (७५), सुभाष गोरे (६०), आशाबाई गोरे (६०), विश्वनाथ वाघ (१०), अनिता गांगुर्डे (३५), पार्वती गांगुर्डे (४०), पार्वर्ती पवार (६५), प्रिया वाघ, प्रतीक्षा गांगुर्डे, चंद्रकला गोरे, सुहास गांगुर्डे, सुभाष बरडे यासह आदी जखमी झाले आहेत.
पापळ या गावात राम वाघ यांचे लग्न लागल्यानंतर हे वºहाड घनसावंगी तालुक्यातील रवना या गावाकडे टेम्पोने परत जात होते. जालना शहराजवळील दत्त आश्रमजवळ आल्यावर पाठीमागून येणाºया ट्रेलर (क्रं.एमएच. ०४. २०३३) ने टेम्पो (क्रं.एमएच.२४. एफ.५७९२) ला जोराची धडक दिली. या धडकेत टेम्पो हा रस्त्याच्या कडेला गेल्याने पलटी झाला. रस्त्याच्या कडेला टेम्पो पलटी झाल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन जखमींना मदत केली. या टेम्पोत महिला व लहान मुलांचा समावेश होता. यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
ट्रेलर चालक फरार
ही घटना घडताच ट्रेलर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.
तीन जण गंभीर
या अपघातात २५ जण जखमी झाले असून, यातील तीन जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एकास रात्री उशीरा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हालविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महिला व मुलांचा समावेश
लग्न लागल्यानंतर सर्व महिला व मुलांना एका टेम्पोत बसविण्यात आले. याच टेम्पोला अपघात झाल्याने यात महिला व मुले जखमी झाले आहेत.

Web Title: Tempo recovers in Jalna, and injures 25-bone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.