हातगाडी चालूवन भूषण यादवने दिला ८० मुलांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:44 AM2018-08-13T00:44:52+5:302018-08-13T00:45:23+5:30

घरातील अत्यंत गरीब परिस्थिती वडील विविध शाळेसमोर हातगाडी लावून भेळ, तसेच अन्य पदार्थाची विक्री करत असल्याने भूषण यादवलाही उच्च शिक्षण घेता आले नाही, लहानपणापासून संगणकाची आवड मात्र परिस्थितीमुळे ते देखील शक्य झाले नव्हते. आज याच भूषण यादवने परिस्थितीवर मात करत जिद्दीने स्वत: पाच संगणक खरेदीकरून तळागाळातील मुलांना प्रशिक्षण देत आहे.

Support for 80 children given by Bhushan Yadav | हातगाडी चालूवन भूषण यादवने दिला ८० मुलांना आधार

हातगाडी चालूवन भूषण यादवने दिला ८० मुलांना आधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरातील अत्यंत गरीब परिस्थिती वडील विविध शाळेसमोर हातगाडी लावून भेळ, तसेच अन्य पदार्थाची विक्री करत असल्याने भूषण यादवलाही उच्च शिक्षण घेता आले नाही, लहानपणापासून संगणकाची आवड मात्र परिस्थितीमुळे ते देखील शक्य झाले नव्हते. आज याच भूषण यादवने परिस्थितीवर मात करत जिद्दीने स्वत: पाच संगणक खरेदीकरून तळागाळातील मुलांना प्रशिक्षण देत आहे.
भूषण हरदेश यादव हा येथील रामनगर परिसरातील युवक घरातील जेमतेम परिस्थितीमुळे हवालदिल झाला होता. मात्र त्याच्या वडिल आणि भावाने त्याला जी साथ दिली, त्यामुळे तो स्वत:च्या हिमतीवर उभा राहिला. शाळा शिकत असतानाच वडिलांचा हातगाडी लावण्याचा व्यवसायकही तो सांभळत. पुढे त्यानेही स्वत:ची हातगाडी सुरू केली. डॉ. फ्रेजर बॉईजमध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर सूर्यप्रकाश चौधरी, वांगे, वनवे या आयटीआयमधील शिक्षकांमुळे भूषणने टीव्ही आणि रेडीओ मॅकेनिकचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर औरंगाबादेतील कंपनीत नोकरी केली.
परंतु तेथे मन न रमल्याने पुन्हा हातगाडीचा व्यवसाय सुरू केला. राखी तयारणे, होळीच्यावेळी गुलबा पुष्पापासूनचे रंग तयार करणे याकडे त्यांनी मोर्चा वळविला. झोपडपट्टी तसेच मोलमजूरी करणाऱ्यांच्या मुलांना एकत्र करून भूषणे आज राखी तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. तो या मुलांकडून मनमोहक राख्या तयार करून घेताना त्यातून आलेल्या पैशातून त्या गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच परीक्षा शुल्क भरून देण्यासाठी मदत करत आहेत. विशेष म्हणजे या मुलांनी तयार केलेल्या राख्यांना चांगली मागणी असल्याचेही यादव यांनी सांगितले.

Web Title: Support for 80 children given by Bhushan Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.