रेशीम उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:11 AM2018-10-22T00:11:21+5:302018-10-22T00:12:06+5:30

रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन वस्त्रउद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी रेशीम कोष उत्पादक शेतकरी आणि अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले.

Silk growers will not leave the wind | रेशीम उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही

रेशीम उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देअर्जुन खोतकर : मंत्रालयात विशेष बैठक बोलवणार

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन वस्त्रउद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी रेशीम कोष उत्पादक शेतकरी आणि अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले.
रविवारी या रेशीम कोष उत्पादना संदर्भातील आढावा खोतकर यांनी घेतला. जालना जिल्ह्यात जवळपास चार हजार हेक्टरवर रेशीम शेती केली जाते. यातून कमी पाण्यात हमखास उत्पादन मिळते. पूर्वी रोशीम कोषची निर्मिती झाल्यावर त्यांच्या विक्रीसाठी शेतकºयांना कर्नाटकातील रामनगर येथे जावे लागत होते. परंतु आता जालना बाजार समितीने पुढाकार घेत जालन्यात रेशीम कोष खरेदीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिली असल्याचे खोतकर म्हणाले.
बैठकीस रेशीम विभागाचे विभागीय सह संचालक , डी.ए. हाके, जिल्हा रेशीम अधिकारी भांगे, तालुका रेशीम समन्वयक अधिकारी झिगे, पंडित भुतेकर, भरत गव्हाणे, संतोष मोहिते, दीपक बुनगे, चक्रधन धानुरे, अनिरूध्द जाधव, राजाभाऊ कचरे, संदीप लोंढे, सिध्देश्वर पुरी, विजय पाटील, सिध्देश्वर जाधव तानाजी मुळे, लहू जाधव आदींचंी उपस्थिती होती.
जालना : रेशीम पुंज निर्मितीसाठी अनुदान द्या
या बैठकीत शेतकºयांनी रेशीम पुंज निर्मितीसाठी ५० रूपये प्रतिकिलो याप्रमाणे अनुदान द्यावे, या शेतकºयांना शेतात शेततळे उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, रेशीम शेतीसाठी लागणारे शेड उभारणीसाठी बँकांकडून कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच रोजगार हमी योजनेकडून शेतकºयांची थकबाकी लकवर मिळावी यासह अन्य मुद्दे शेतकºयांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या बैठकीत मांडले.
अनेक मुद्यांवर चर्चा
या मुद्यांवर चर्चा करून लवकरच मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले. आपण सोमवारी मुंबईत जात असून, शक्य झाल्यास सोमवारीच या मुद्यांवरील मंत्रालयातील अधिकाºयांना बोलावून त्यांची बैठक घेऊन या मुद्यांवर निर्णय घेण्याचे आपण प्रयत्न करू असेही खोतकºयांनी आश्वाशित केले.

Web Title: Silk growers will not leave the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.