रोहयो; आठवडाभरात दोन हजार मजुरांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:53 AM2018-12-14T00:53:46+5:302018-12-14T00:58:50+5:30

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्याही वाढत आहे. शेतीत आता कामे उरली नसल्याने ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेवर कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर केवळ चार हजार मजुर होते, ती संख्या आता थेट सहा हजारांवर गेली आहे.

Roho; Increase of 2 thousand laborers in the week | रोहयो; आठवडाभरात दोन हजार मजुरांची वाढ

रोहयो; आठवडाभरात दोन हजार मजुरांची वाढ

Next
ठळक मुद्देजालना : स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्याही वाढत आहे. शेतीत आता कामे उरली नसल्याने ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेवर कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर केवळ चार हजार मजुर होते, ती संख्या आता थेट सहा हजारांवर गेली आहे.
जालना जिल्ह्यात सध्या रोजगार हमी योजनेची कामे ही १७२ ग्रामपंचायतमध्ये सुरू असून, त्या कामावर सहा हजार २०० एवढी आहे. या कामांमध्ये कृषी, वनविभाग तसेच रेशीम लागवडीचा समावेश आहे. या कामवरील मजुरांना २०३ रूपये दररोज हे त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. दरम्यान, आतापर्यंत कुशल आणि अकुशल मजुरांवर एकूण ३२ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती रोजगार हमी विभागाकडून देण्यात आली. जालना जिल्ह्यातून जालना शहर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबईला कामाच्या शोधात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु बाहेरच्या शहरात जात असताना बहुतांश कुटुंब हे ग्रामपंचायतीला कल्पना न देताच स्थलांतर करत असल्याने प्रशासनाकडे नेमके किती कुंटुंब बाहेरगावी गेले आहेत, याचा तपशील मिळण्यास अडचणी येत आहेत.
गावपातळीवर कामे नसल्याने जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत मिळेल ते काम करण्यासाठी ग्रामीण भागातील बेरोजगार युवक एकवेळचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था असल्यास केवळ १०० रूपये रोज या दरात काम करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. आयटीआयमध्ये तर बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत.
तालुकानिहाय कामे आणि मजुरांची संख्या
अंबड ६४ (५९१), बदनापूर ९३ (६३६), भोकरदन १७ (२०१), घनसावंगी १८६ (१६६९), जाफराबाद २६ (१४१), मंठा २८ (२२८), जालना २७ (५६४), परतूर २६० (२१९२) असे एकूण ७०३ ग्रामपंचायतींमध्ये ६ हजार २२ मजुरांची संख्या रोजगार हमी योजनेच्या कामावर आहे. कंसाबाहेरील आकडे हे त्या त्या तालुक्यातील ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या कामांची असून कंसातील आकडे मजुरांची संख्या दर्शवितात.

Web Title: Roho; Increase of 2 thousand laborers in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.