पिकांच्या वर्गवारीनुसारच भरपाई द्या, जालना जिल्ह्यातील शेतक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:24 AM2018-02-17T00:24:27+5:302018-02-17T00:24:34+5:30

फळबाग, बियाणे उत्पादक, भाजीपाला आदी पिकांच्या वर्गवारीनुसारच गारपिटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळावी, अशी आपली मागणी आहे. हा मुद्दा आपण आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

Provide compensation according to the category of crops, Farmers demand in Jalna district | पिकांच्या वर्गवारीनुसारच भरपाई द्या, जालना जिल्ह्यातील शेतक-यांची मागणी

पिकांच्या वर्गवारीनुसारच भरपाई द्या, जालना जिल्ह्यातील शेतक-यांची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देदिवाकर रावते : गारपिटीने नुकसान झालेल्या द्राक्ष, भाजीपाला व पिकांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : फळबाग, बियाणे उत्पादक, भाजीपाला आदी पिकांच्या वर्गवारीनुसारच गारपिटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळावी, अशी आपली मागणी आहे. हा मुद्दा आपण आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
जालना शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी पाच दिवसांपूर्वी गारपीट आणि अवकाळ पाऊस झाला होता. यात तब्बल ३८ हजार हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. रावते यांनी शुक्रवारी दुपारी जालना तालुक्यातील वाघु्रळ येथे द्राक्ष बागा, भाजीपाला व इतर गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. या पाहणीत शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी पिकांच्या वर्गवारीनुसार भरपाई मिळवून देण्याची मागणी रावते यांच्याकडे केली. त्यानंतर हा मुद्दा अत्यंत योग्य असून, एक एकर फळबागेतून मिळणारे उत्पन्न अधिक असते. त्यानंतर बियाणे उत्पादन, भाजीपाला आणि पारंपरिक पिकांचे उत्पादन मिळते. मात्र, या पिकांचे नुकसान झाल्यास सरसकट भरपाई जाहीर केली जाते. हे अयोग्य असून, पिकांच्या वर्गवारीनुसारच नुकसान भरपाई वा आर्थिक मदत जाहीर केली जावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. यावेळी नुकसान झालेल्या पिकांचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश रावते यांनी अधिकाºयांना दिले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, पंचायत समिती पांडुरंग डोंगरे, भाऊसाहेब घुगे, संतोष मोहिते, बबन खरात, बाला परदेशी, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार विपीन पाटील उपस्थित होते.

Web Title: Provide compensation according to the category of crops, Farmers demand in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.