फळबागा लागवड करा, कृषी विभागाचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:08 AM2019-02-22T01:08:18+5:302019-02-22T01:08:53+5:30

फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुका कृषी कार्यालय जाफराबाद यांनी यावर्षी १०४ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

Plantation of orchards, agrochemicals department | फळबागा लागवड करा, कृषी विभागाचा तगादा

फळबागा लागवड करा, कृषी विभागाचा तगादा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुका कृषी कार्यालय जाफराबाद यांनी यावर्षी १०४ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या करिता जवळपास १०६ लाभार्थ्यांची निवड करून त्यांना फळबाग लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्यासाठीच पाणी नाही तर फळबागा कशा जगवायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली. शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी शासन तीन टप्प्यांत अनुदान देणार आहे. त्यानुसार तालुका कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवड करण्यास इच्छुक असलेल्या शेतक-यांकडून जून महिन्यात आॅनलाईन अर्ज मागवले होते. ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करून पात्र शेतक-यांना मार्चअखेर फळबाग लागवड करण्याचे आदेशही दिले आहेत.
मार्च महिन्यापर्यंत फळबाग लागवड न केल्यास निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची मुदत रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी वेळेत मिळत नाही, फळबागाची लागवड कशी करायची, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहे.
या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. तालुक्यात एकूण १०४.६ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्यात येणार आहे. या करिता टप्प्या-टप्प्याने सूक्ष्मसिंचन, कलमे, खड्डे खोदकाम करून रोपे लावून याचा अहवाल कृषी अधिकारी कार्यालयाला मार्च अखेरपर्यंत द्यावा लागणार आहे.

Web Title: Plantation of orchards, agrochemicals department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.