पूर्णा नदीच्या पुरात एक जण वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:46 AM2018-08-18T00:46:34+5:302018-08-18T00:46:47+5:30

ग्रामपंचायत अतर्गत असलेल्या मेरखेडा येथील वंसता रामदास क्षीरसागर वय ५५ हे शुक्रवारी सकाळी पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेले. तब्बल सहा तासांपासुन शोधकार्य केल्या नंतरही त्यांचा शोध लागला नाही.

One person missing in the river Purna | पूर्णा नदीच्या पुरात एक जण वाहून गेला

पूर्णा नदीच्या पुरात एक जण वाहून गेला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : येथील ग्रामपंचायत अतर्गत असलेल्या मेरखेडा येथील वंसता रामदास क्षीरसागर वय ५५ हे शुक्रवारी सकाळी पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेले. तब्बल सहा तासांपासुन शोधकार्य केल्या नंतरही त्यांचा शोध लागला नाही. सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
या विषयी प्रत्यक्ष दर्शनींनी सागिंतल्या प्रमाणे वंसता क्षीरसागर गुरे चारण्यासाठी गेले असताना त्यांची गाय पाण्यात उतरली. त्या गायीला वाचविण्यासाठी वंसता पाण्यात उतरले.मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांनी वाचविण्यासाठी धावा केला.पंरतु काही क्षणात ते बेपत्ता झाले. याची माहिती वा-यासारखी परीसरात पसरली. तेव्हा मोठ्या संख्येने ग्रामस्त घटनास्थळी हजर झाले. अनेक ग्रामस्थांनी पाण्यात उडी घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला. या ठिकाणी नायब तहसीलदार के.टी. तांगडे, मंडळ अधिकारी एस.डी.दिघे, व्हि.पी.मालोदे, एस.टी.दळवी, ए.आर.वानखेडे, एस.आर.देवकाते, ए.व्ही. उरफाटे. बिट जमादार आर.एस.भोपळे यांच्यासह नगर परीषदचे कर्मचारी हजर झाले होते. प्रशासनाची शोध मोहीम उशीरापर्यंत सुरू होती. क्षिरसागर हे पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेले असल्याची माहिती प्रशासनाला वेळीच देण्यात आली होती. त्यावर त्यांचे कर्मचारी घटनास्थळावर हजर झाले तरी सुध्दा त्यांच्या बोटी द्वारे शोध घेऊनही क्षीरसागर यांचा शोध लागू शकला नाही.

Web Title: One person missing in the river Purna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.