तूर खरेदी; शासनाचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:55 AM2019-01-31T00:55:41+5:302019-01-31T00:57:21+5:30

नाफेडेने उशिराने का होईना तूर नोंदणीसाठी गुरुवारचा मुहूर्त काढला आहे.

Nafed will purchase pigeons from thursday | तूर खरेदी; शासनाचे वरातीमागून घोडे

तूर खरेदी; शासनाचे वरातीमागून घोडे

googlenewsNext

गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे खरीप, रबीतील पिकाला मोठा फटका बसला आहे. असे असताना नाफेडेने उशिराने का होईना तूर नोंदणीसाठी गुरुवारचा मुहूर्त काढला आहे. याचा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापा-यांनाच जास्त फायदा होणार असल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षी जिल्ह्यात तीन केंद्रावर ५० हजार क्विंटलपेंक्षा जास्त तूर आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली होती. शासनाने शेतक-यांना ५ हजार ४५० रूपये हमी भाव दिला होता. तूरीतील आद्रता, आणि काडीकचरा आदी जाचक अटींमुळे शेतक-यांना मोठा फटका बसला होता. यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला. एकरी उत्पन्नात घट झाली. असे असताना शासनाने यंदा हमीभावात २२५ रुपयांची वाढ केली. ५ हजार ६७५ रूपये प्रतिक्विंटलने तुरीची खरेदी करण्याचे आदेश जिल्हा मार्केटींग विभागाला दिले आहेत. आधीच तुरीची नोंदणी उशिराने सुरु केल्याने शेतक-यात नाराजी आहे. खुल्या बाजारात लाल तुरीला ५३६१ तर पांढ-या तुरीला ५६६५ रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. असे असताना शासनाने उशिराने केंद्र सुरु करुन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचे शेतकरी गजानन उजेड म्हणाले.
नाफेडने तूर विक्रीसाठी शेतकºयांना एक आठवड्याचा अवधी दिला आहे. नोंदणी झाल्यानंतर ६ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी कागदपत्रे
शेतकºयांनी तुरीच्या आॅनलाईन नोंदणीसाठी सातबारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि २०१८ - १९ या वर्षात सातबा-यावर तुरीचा पेरा आदी कागदपत्राची छायांकित प्रत नोंदणीसाठी शेतक-यांनी सोबत आणावेत

Web Title: Nafed will purchase pigeons from thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.