जालन्यात तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:25 AM2019-01-24T00:25:16+5:302019-01-24T00:25:19+5:30

टीव्ही सेंटरजवळ राहणाऱ्या एका १८ वर्षाच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली.

Murder of the youth in Jalna | जालन्यात तरुणाचा खून

जालन्यात तरुणाचा खून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील टीव्ही सेंटरजवळ राहणाऱ्या एका १८ वर्षाच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली. संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपी बंटी उर्फ विनोद देवराव गायकवाड याच्या निवासस्थानी मोठा रोष व्यक्त करून घर जाळण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. परंतु वेळीच उपस्थितांनी मध्यस्थी करून हा संतप्त जमावाला शांत केले. दरम्यान आरोपीला अटक करण्यासाठी नूतन वसाहत भागात किरकोळ स्वरूपाची दगडफेक बुधवारी दुपारी करण्यात आली. या प्रकरणात विनोद गायकवाडला अटक केली आहे.
गेल्या वर्षी चार डिसेंबरला एका विवाह समारंभात कांचननगरमध्ये बंटी गायकवाड आणि मयत शाहू उर्फ राहुल कचरू उमप यांच्या नाचण्याच्या कारणावरून मोठा वादा झाला होता. हा वाद त्यावेळी उपस्थित नातेवाईकांनी मध्यस्थी करून सोडवला होता. परंतु बंटीने तुझा काटा काढतो अशी धमकी दिली होती. त्यावरून १८ जानेवारीला बंटी गायकवाड आणि राहुल उमप यांच्यात वाद झाला होता. त्यावेळीही राहुलला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर राहुल उमप हा नेहमीप्रमाणे बक-या चारण्यासाठी जंगलात गेला होता. त्यावेळी त्याला कोंडून बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप राहुल उमपच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांना बुधवारी दिलेल्या निवेदनात केला आहे.
राहुल घरी आलाच नाही
राहुल हा बक-या चारून घरी आला नसल्याची तक्रार राहुलचा भाऊ शिवाजी उमप याने तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांना राहुलचा खून झाल्याची माहिती खब-या मार्फत मिळाली. त्यांनी लगेचच राहुल ज्या कॉलनीमध्ये राहत होता, त्या भागातील विहिरींची तपासणी अग्निशमन दलाच्या पथकाकडून करण्यात आली.
त्यावेळी त्या विहिरीत राहुल उपमचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी बंट गायकवाडला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली. आरोपीला अटक करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमले होते. यात पोलीस कर्मचारी मदन, आटोळे, मुंडे, चव्हाण, पठाण, मुंडे, खरात यांचा समावेश
होता.
विवाह समारंभात नृत्य करण्याच्या कारणावरून मित्र असलेल्या विकी गायकवाड सोबत क्षुल्लक वाद झाला. या वादातूनच हा खून झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपासून गायब असलेल्या राहूलचा खून झाल्याचे कळाल्यावर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Murder of the youth in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.