विविध संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:48 AM2019-07-23T00:48:31+5:302019-07-23T00:48:47+5:30

विविध संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Movement to hold in front of the collector's office of various organizations | विविध संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

विविध संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले संगणक प्रशिक्षण केंद्र तात्काळ सुरु करावे, प्रशिक्षण केंद्राच्या जागेचा दुरुपायोग करणाऱ्या सहायक समाजकल्याण आयुक्तांना निलंबित करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी विविध संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी भारिपचे अ‍ॅड बी.एम. साळवे, रिपब्लिकन सेनेचे अ‍ॅड. शिवाजी आदमाने, मातंग मुक्ती सेनेचे अशोक साबळे, रिपाइंचे किशोर मघाडे, भीमसेना पँथर्सचे मधुकर घेवंदे, पीआरपी. राजेंद्र हिवाळे, रिपाइंचे विठ्ठल म्हस्के, विरेंद्र रत्नपारखे, चर्मकार संघटनेचे राकेश कुरील, अ‍ॅड किशोर चत्रे, सत्यकुमार करंडे, बसपाचे बी. के. बोर्डे, अ‍ॅड राकेशसिंग ठाकूर, संतोष खरात आदी उपस्थित होते.
भीमा कोरेगाव दंगली प्रकरणात कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, कामगार अधिकार कार्यालयातील कामगारांची अडवणूक थांबवून अनुदान वाटप करावे, प्रदूषण टाळण्यासाठी औद्योगिक वसाहत परिसरात प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवावे, धामना धरणाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करणाºया अभियंत्याला निलंबीत करावे, विशाल कॉर्नर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवावी, रमाई घरकुल योजनेच्या बांधकाम परवान्याची अट रद्द करुन अनुदानाची रक्कम तातडीने द्यावी आदी विविध मागण्या करण्यात आल्या.

Web Title: Movement to hold in front of the collector's office of various organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.