कंपनी भागीदारीत लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:15 AM2018-01-25T00:15:35+5:302018-01-25T00:16:20+5:30

भागीदारीत असलेली कंपनी हस्तांतरित करण्याचा करार करून फसवणूक करणाºया चार जणांवर बुधवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Millions of fraud in the company partnership | कंपनी भागीदारीत लाखोंची फसवणूक

कंपनी भागीदारीत लाखोंची फसवणूक

Next

जालना : भागीदारीत असलेली कंपनी हस्तांतरित करण्याचा करार करून फसवणूक करणाºया चार जणांवर बुधवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यापारी आनंद अशोककुमार रुणवाल यांनी फिर्याद दिली आहे. योगेश रामनिवास मानधने, गोपाल एम. मानधने (रा.करवानगर), ललित रजनीकांत निर्मल, विवेक जगदीश दायमा यांच्यासोबत आपण २००८ मध्ये भागीदारीत एमआरएम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सुरू केली. यासाठी स्टेट बँक आॅफ हैदराबादकडून कर्ज घेतले. दरम्यानच्या काळात या चौघांनी कंपनीकडे असलेले सुमारे एक कोटी ५२ लाखांचे कर्ज फेडण्याच्या अटीवर सर्व कंपनीची मालकी आपणास देण्याचे लेखी करार केले. सर्व कर्जफेड करूनही त्यांनी कराराच्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड केली. तसेच कंपनीची संपूर्ण मालकी आपणास न देता, कंपनीच्या खात्यातून अधिकार नसतानाही पैसे काढून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक महादेव राऊत अधिक तपास करीत आहेत.
--------------

Web Title: Millions of fraud in the company partnership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.