महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:03 AM2018-12-14T01:03:13+5:302018-12-14T01:04:15+5:30

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि जालना जिल्हा तालीम संघाच्या वतीने जालन्यात १९ ते २३ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

Maharashtra Kesari Wrestling Championship | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी

googlenewsNext
ठळक मुद्देजालना : समन्वय ठेवण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि जालना जिल्हा तालीम संघाच्या वतीने जालन्यात १९ ते २३ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपआपसात समन्वय ठेवून कर्तव्य बजवावे, असे आवाहन कुस्ती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष राज्यतमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरूवारी दिले. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
जालन्यातील आझाद मैदानावर ही ६२ वी कुस्ती स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने ही पूर्वतयारीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर, अभिमन्यू खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, तालीम संघाचे अध्यक्ष किसनलाल भगत, सचिव प्रा. डॉ. दयानंद भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुपारकर, पांडूरंग डोंगरे, प्राचार्य कटारे, विष्णू पाचफुले, आत्मनंद भगत, गोपाळ काबलिये, सुशिल भावसार, अंकुश पाचफुले, विकास क्षीरसागर, विक्रम कुसूंदल आदींची उपस्थिती होती.
यावेळी आझाद मैदान परिसरातील स्वच्छता तसेच सुरक्षेवरही चर्चा करण्यात आली. वीज पुरवठा अखंडित राखणयसाठी सूचना खोतकर यांनी दिल्या. कुस्ती स्पर्धा परिसरात वैद्यकीय पथक आणि कर्मचारी तैनात ठेवण्यावरही चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड यांच्यासह पोलीस व सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
४५ संघांचा सहभाग
या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्हे तसेच महानगर पालिका क्षेत्रातून ४५ संघ सहभागी होणार आहेत. यात संघ व्यवस्थापक तसेच कुस्ती संदर्भातील पंच आणि अन्य तांत्रिक अधिकारी असे एकूण एक हजार २०० अधिकारी तसेच पदाधिकारी येणार आहेत.

Web Title: Maharashtra Kesari Wrestling Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.