वीज मीटरचे रीडिंग घेण्यापूर्वी आता मिळणार एसएमएसव्दारे सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:16 AM2019-03-21T00:16:59+5:302019-03-21T00:17:27+5:30

मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.

Instructions on getting the electricity meter read before now | वीज मीटरचे रीडिंग घेण्यापूर्वी आता मिळणार एसएमएसव्दारे सूचना

वीज मीटरचे रीडिंग घेण्यापूर्वी आता मिळणार एसएमएसव्दारे सूचना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रीडिंग आणि वीजबिलात अचूकता व पारदर्शकता रहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.
महावितरणने आॅगस्ट २०१६ पासून मोबाईल अ‍ॅपव्दारे मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात मोठया प्रमाणात अचूकताही आली आहे. आता वीजमीटर रीडिंग प्रक्रियेत ग्राहकांना आपले मीटर रीडिंग तात्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाईलवर ग्राहकांना मीटर रीडिंगच्या पूर्वसूचनेचा एसएमएस देण्यात येणार असून यात सकाळी ८ ते १०, १० ते १२ दुपारी १२ ते ३ आणि ३ ते ६ या दरम्यान कोणत्या वेळेत रीडिंग घेतले जाणार आहे याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार असून रीडिंग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहून योग्य रीडिंग घेतले जात आहे अथवा नाही, याची खातरजमा करता येणे शक्य होणार आहे.
या नवीन सुविधेतून ग्राहकांच्या मीटर रीडिंग बाबतच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच अनेकवेळा संबंधित कर्मचारी हे वीज मीटर बाहेर असल्याने कधी रीडिंग घेऊन जातात ते कळतही नाही.

Web Title: Instructions on getting the electricity meter read before now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.