राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस

By संजय पाठक | Published: May 9, 2024 10:29 AM2024-05-09T10:29:56+5:302024-05-09T10:32:03+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक मध्ये वातावरण तापले असून उद्धव सेनेचे  जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे.

lok sabha election 2024 thackeray group District Chief sudhakar Badgujar Deportation Notice | राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस

राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस

संजय पाठक

नाशिक- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक मध्ये वातावरण तापले असून उद्धव सेनेचे  जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे.अर्थात आज सकाळी 8 वाजता पोलीस नोटीस बजावण्यासाठी गेले असता बडगुजर यांनी ती स्वीकारली नसून सकाळी 11 वाजता आपण स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हजर राहून आपली बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या राजकारण तापले असून शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे विरुद्ध उद्धव सेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यात लढत होत आहे. अशावेळी संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे.

आज सकाळी ही नोटीस बनवण्यासाठी अंबड पोलीस गेले होते. 2010- 11 मध्ये केलेल्या राजकीय आंदोलनासंदर्भात ही नोटीस असून यासंदर्भात आपलयाला अटकही झाली होती. त्यामुळे आता हद्दपारच्या नोटीसीचा प्रयत्न प्रश्नच उद्भवत नाही असे बडगुजर यांनी सांगितले. केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन निवडणुकीत अडचण होत असल्याने आपल्याला हद्दपार करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा सुधाकर बडगुजर यांनी लोकमतची बोलताना केला आहे.

बडगुजर यांच्यावर याच वर्षी मुंबई बॉम्ब स्फोट खटल्यातील गुन्हेगार सलीम कुता याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून चौकशीला सामोरे जावे लागले होते. तसेच महापालिकेचे नगरसेवक असताना ठेकेदार कंपनीचा राजीनामा देऊन प्रत्यक्षात आर्थिक लाभ घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: lok sabha election 2024 thackeray group District Chief sudhakar Badgujar Deportation Notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.