मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:32 AM2019-05-31T00:32:58+5:302019-05-31T00:33:22+5:30

ठा तालुक्यातील १८७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ८१.५७ टक्के लागला आहे.

HSC results for Mantha taluka 81%; This time the girl's bet | मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी

मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा: यावर्षी मंठा तालुक्यातील १८७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ८१.५७ टक्के लागला आहे.
या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचे २१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ७७ टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखा ११९ विद्यार्थी उत्तीर्ण ७९.९ टक्के, विज्ञान शाखेचे २१३ विद्यार्थी उत्तीर्ण ९७.३ टक्के निकाल, रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ८१ टक्के निकाल लागला असून, १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाला लागला आहे.
ढोकसाळ येथील सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कला शाखेचे ४० पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७१.७३ टक्के निकाल.
बेलोरा येथील शरद प्रतिभा माध्यमिक व उच्च माध्यमिकचे ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. असून ८० टक्के निकाल लागला असून, दहिफळ खंदारे येथील ज्ञानदीप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कलाशाखेचे ७५ विद्यार्थी उत्तीर्ण ८२ टक्के निकाल लागला. तळणी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा ८७ टक्के निकाल लागला.
द्रोपदाबाई आकात विद्यालयात विज्ञान शाखेचा ६८ टक्के निकाल लागला. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

Web Title: HSC results for Mantha taluka 81%; This time the girl's bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.