भाजप सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:29 AM2018-10-30T00:29:31+5:302018-10-30T00:30:39+5:30

मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे.

Expose the BJP government | भाजप सरकारला हद्दपार करा

भाजप सरकारला हद्दपार करा

Next
ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचे आवाहन मंठ्यातील जनसंघर्ष यात्रेत एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारला आगामी काळात त्यांची जागा दाखवून हद्दपार करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश कॉगेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंठा येथे सोमवारी आयोजित केले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पोहचली होती. यावेळी या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संघर्ष यात्रेचे नंतर जाहीर सभेत रूपांतर झाले यावेळी व्यासपीठावर ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वडीवेट्टीवार, रामप्रसाद बोराडे, रामकिसन ओझा, सुरेश देशमुख, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ.धोडीराम राठोड, आर.आर. खडके ,भीमराव डोंगरे, तालुका कॉग्रेसचे निळकंठ वायाळ, शहराध्यक्ष शबाब कुरेशी, किसनराव मोरे ,नितीन जेथलिया आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, हे सरकार प्रत्येक राजकिय कामासाठी समाजाचा वापर करत असुन सर्वसामान्यांना केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवत आहे. आज राफेलचा मुद्दा असो की, सीबीआयचा गोंधळ यामुळे सरकारची छबी डगाळली आहे. राफेल प्रकरणात अद्यापही पंतप्रधान मोदींनी तोंड उघडले नसल्याचे चव्हाण म्हणाले.
दिल्ली येथे भाजपाचे कार्यलय हे एका वर्षात होते आणि महापुरूषांचे पुतळे वषार्नुवर्षे रखडत असल्याचे शेवटी बोलतांना सांगितले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, समाजातील सर्व घटक नाराज असून, जीएसटी मुळे व्यापारी उध्वस्त झाला. शेतकºयांना हमीभावाचे नुसते गाजर दाखवले. रूपया घसरला आहे. डिझेल, पेट्रोल महाग , राज्य सरकारकडे कर्मचाºयांना वेतन अयोग लागू करताना चालढकल केली जात असल्याचे चव्हाण म्हणाले. नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. दुष्काळ निवारणासाठी कुठलीच ठोस उपाययोजना सरकारने केली नसल्याचा आरोप ही चव्हाण यांनी केला.
सरकार गोंधळून गेले असुन फक्त घोषणा करत फिरत आहेत. महागाई नियंत्रणात न आणल्याने सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. कर्जमाफीच्या गोंधळावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. उज्ज्वला गॅसची योजना म्हणजे मोठी फसवणूक आहे. आॅनलाईनच्या नावावर सरकारने शेतकºयांना फसवले आहे. धार्मिक धुर्वीकरण करत समाजात तेढ निर्माण करण्याची भावना सरकारची असल्याचेही पुथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री विजय वडीवेट्टीवार यांनीही सरकारच्या एकूणच धोरणांचा समाचार घेतला. तोफीक मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Expose the BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.