४० हजार लिटर ताक वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:10 AM2019-06-17T00:10:04+5:302019-06-17T00:10:49+5:30

चंद्रप्रभू जैन मंदिरातील जिन शासन सेवा ग्रुपच्यावतीने भगवान महावीर यांच्या २५४७ व्या जनकल्याणक महोत्सवा निमित्त गुढी पाडव्यापासून सलग ७२ दिवस मामा चौकातील क्रिस्टल कॉम्प्लेक्समध्ये वाटसरूंसाठी थंड ताकाचे वाटप करण्यात आले.

Distribution of 40 thousand liters of water | ४० हजार लिटर ताक वाटप

४० हजार लिटर ताक वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील चंद्रप्रभू जैन मंदिरातील जिन शासन सेवा ग्रुपच्यावतीने भगवान महावीर यांच्या २५४७ व्या जनकल्याणक महोत्सवा निमित्त गुढी पाडव्यापासून सलग ७२ दिवस मामा चौकातील क्रिस्टल कॉम्प्लेक्समध्ये वाटसरूंसाठी थंड ताकाचे वाटप करण्यात आले.
भगवान महावीर हे ७२ वर्ष जगले होते. त्यामुळेच सलग ७२ दिवस ताक वाटपाचा उपक्रम येथील जिन शासन सेवा ग्रुपने हाती घेतल्याची माहिती यावेळी ज्येष्ठ उद्योजक विनयकुमार आबड यांनी दिली. युवकांनी केलेल्या सेवेचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
रविवारी सकाळी या ताक वाटप उपक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी विनयुकमार आबड, अशोक बिनायकिया, उद्योजक शिवरतन मुंदडा, संजय लव्हाडे, सुरेश मुथा, अजित छाबडा, अ‍ॅड. अनिल संचेती, शंकर शर्मा, स्वरूपचंद ललवाणी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिी होती.
यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक होता. त्यामुळे लोकांना पाण्यासोबच थंड पेय म्हणून ताक वाटपाचा उपक्रम जिन शासन सेवा ग्रुपने घेतला. त्यासाठी समाजातील दानशुरांची मोठी मदत झाल्याची माहिती प्रास्ताविकातून दीपक मोदी यांनी दिली. यावेळी शंकर शर्मा यांनी जागा तसेच लाईट उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचा विनयकुमार आबड यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आबड म्हणाले की, आजची युवा पिढी ही सक्षम असल्याचे आम्हाला या उपक्रमातून दिसून आले. भविष्यातही या युवकांकडून अशाच चांगल्या उपक्रमांची आशा त्यांनी व्यक्त केली. दररोज ६०० लिटर मसाला ताक वाटपासाठी ज्यांनी मदत केली त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिन शासन सेवा ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Web Title: Distribution of 40 thousand liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.