सीईओंना निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:15 AM2018-01-07T00:15:02+5:302018-01-07T00:15:20+5:30

विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शनिवारी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.

Demand for Suspension of the CEO | सीईओंना निलंबित करा

सीईओंना निलंबित करा

googlenewsNext

जालना : विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शनिवारी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनेही या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिका-यांनी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना निवेदन दिले. दीपक चौधरी यांनी तीन दिवसांपूर्वी जिल्हा ग्रामीण यंत्रणामध्ये कार्यरत महिला अधिका-याचा विनयभंग केला. पीडित महिलेने कदीम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. मात्र चौधरी आपले वजन वापरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या स्वीय सहायकाने सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेजही गायब केले आहे. हा प्रकार गंभीर असून, त्याची सीआयडीमार्फत चौकशी करावी. त्यातून सत्य बाहेर येईल, असे निवेदनात नमूद आहे. या वेळी काकासाहेब खरात, मनीषा भोसले, मंदा पवार, संतोष गाजरे, विजय वाडेकर, बंडू नन्नवरे, महादेव काळे, सुदर्शन तारख, चंद्रकांत खजिनदार, गुलाबराव देशमुख, राजेश मोरे, उषा मिसाळ, शीतल तनपुरे, विमल आगलावे, सुमन गाडेकर, शरद गाजरे, अभिमान जगताप, कैलास जगताप आदींची उपस्थिती होती.
......
महिला काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
महिला काँग्रेस कमिटीने शनिवारी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना या संदर्भात निवेदन दिले. कडक कारवाईनंतरच जिल्हा परिषदेत महिला अधिकारी, कर्मचारी भयमुक्त वातावरणात काम करू शकतील, असे निवेदनात नमूद आहे. महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, शाहीन शेख, मंदा पवार, सुनीता डुरे, वैशाली खरात, शहाजहाँ बेग आदींची उपस्थिती होती.

Web Title: Demand for Suspension of the CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.