अपघातात युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 01:34 AM2020-02-20T01:34:43+5:302020-02-20T01:35:09+5:30

जालना शहरातील कन्हैय्यानगर भागात कंटेनरने जोराची धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला

Death of young man in accident | अपघातात युवकाचा मृत्यू

अपघातात युवकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : जालना शहरातील कन्हैय्यानगर भागात कंटेनरने जोराची धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी घडली असून, घटनेनंतर जमावाने कंटेनरवर दगडफेक केली.
सय्यद मतीन सय्यद अकील (१९) असे मयत युवकाचे नाव आहे. जालना शहरातील कन्हैय्यानगर भागात राहणारा सय्यद मतीन सय्यद अकील हा युवक बुधवारी सकाळी एका पुलावरून जात होता. त्यावेळी जालना मार्गे देऊळगाव राजा रोडकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्र.एन.एल.०१- ए.सी.६८९१) सय्यद याला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सय्यदचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कंटेनरवर दगडफेक केली. या प्रकरणी सय्यद शकील सय्यद बु-हान यांच्या तक्रारीवरून चालक दिलीप एलगुट्टेविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Death of young man in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.