नसडगावात बैलगाडीसह विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:16 AM2019-02-13T00:16:45+5:302019-02-13T00:17:57+5:30

बैलगाडी घेऊन शेतात जात असताना बैल उधळल्याने शेतकरी बैलगाडीसह विहीरीत पडला. त्यातच शेतकºयांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

The death of the farmer due to absence of a bullock cart in the well | नसडगावात बैलगाडीसह विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

नसडगावात बैलगाडीसह विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

विरेगाव : बैलगाडी घेऊन शेतात जात असताना बैल उधळल्याने शेतकरी बैलगाडीसह विहीरीत पडला. त्यातच शेतकºयांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दोन बैल गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी जालना तालुक्यातील नसडगाव शिवारात घडली सोपान बबनराव नागवे (३५) मयत शेतकºयाचे नाव आहे.
तालुक्यातील डुकरी - पिंपरी येथील सोपान नागवे यांची नसडगाव शिवारात शेती आहे. नव्यानेच खरेदी केलेल्या बैलांना प्रथमच बैलगाडीस जुंपून शेतात जात असतांना अचानक बैल उधळल्याने नागवे यांचे बैलगाडीवरील नियत्रण सुटले. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या वसंत देशमुख यांच्या शेतात बैलगाडी पडल्याने सोपान नागवे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बैलगाडी विहिरीत पडल्याने परिसरात जोराचा आवाज झाला. यामुळे परिसरात शेतात काम करणाºया शेतकºयांनी विहिरीकडे धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने शेतकरी नागवे आणि बैलांना विहिरीबाहेर काढण्यात आले. मात्र गंभीर मार लागल्याने नागवे यांचा जागीच मृत्यू झाला.
ग्रामस्थांनी शर्थींने प्रयत्न केल्याने दोन्ही बैलाना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. घटनेची माहिती मिळताच मौजपूरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्र यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नागवे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक पाच वर्षाचा मुलगा आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शवविच्छेदनास विलंब
सकाळी घटना घडल्यावर सोपान नागवे यांचा मृतदेह शवविच्छेदानासाठी विरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रात कर्मचारी उपलब्ध नसल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही नाही. विरेगाव नंतर नेर, रांजणी येथील आरोग्य केंद्रात विचारणा केली असता, तेथील कर्मचाºयांनी देखील नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी सोपान नागवे यांचा मृतदेह शवविच्देनासाठी थेट जालना येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला. तेथे ते दुपारी पूर्ण करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Web Title: The death of the farmer due to absence of a bullock cart in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.