दारू विक्रेत्यांचा पोलिसांच्या गाडीवर हल्ला; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:03 AM2018-10-16T01:03:21+5:302018-10-16T01:03:43+5:30

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून परतणाऱ्या पोलीसांच्या जीपला लक्ष्य बनवित अवैध दारू विक्रेत्यांनी भर रस्त्यावर धूडघूस घातल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

Alcohol vendors attacked police car; One injured | दारू विक्रेत्यांचा पोलिसांच्या गाडीवर हल्ला; एक जखमी

दारू विक्रेत्यांचा पोलिसांच्या गाडीवर हल्ला; एक जखमी

Next
ठळक मुद्देकोंंबींंग आॅपरेशन : ९ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून परतणाऱ्या पोलीसांच्या जीपला लक्ष्य बनवित अवैध दारू विक्रेत्यांनी भर रस्त्यावर धूडघूस घातल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर सोमवारी दिवसभर आरटीबी पोलीसांच्या विशेष कुमकसह टेंभुर्णी व जाफराबाद पोलीसांनी दिवसभर केलेल्या कोबींग आॅपरेशनमध्ये नऊ जणांना ताब्यात घेतले.
याबाबत टेंभुर्णी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की रविवारी ९ वाजेच्या दरम्यान टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव व त्यांच्या पथकाने देळेगव्हाण येथे छापा टाकल्याने हा वाद उफाळल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान सोमवारी सकाळीच जालना येथील आरटीबी पोलीसांच्या विशेष कुमकसह टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सपोनि शंकर शिंदे, जाफराबादसपोनि मिलिंद खोपडे यांनी आपल्या कर्मचाºयांनी कोबींग आॅपरेशन मध्ये ९ आरोपींना शोधून अटक केली. यासोबतच या कोबींग मध्ये पोलिसांना दोन चंदन चोर ही सापडले. त्यांच्याकडून पोलीसांनी १ लाख रुपए किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांनाही अटक केली आहे.

Web Title: Alcohol vendors attacked police car; One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.