दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ विमान दलदलीत सापडले

By admin | Published: April 29, 2017 07:11 AM2017-04-29T07:11:55+5:302017-04-29T07:11:55+5:30

कधीकधी अशा गूढ गोष्टी समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. आॅस्ट्रेलियन रॉयल एअर फोर्सच्या जवानांना याचा अनुभव आला.

Second World War fighter aircraft found in mud | दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ विमान दलदलीत सापडले

दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ विमान दलदलीत सापडले

Next

कधीकधी अशा गूढ गोष्टी समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. आॅस्ट्रेलियन रॉयल एअर फोर्सच्या जवानांना याचा अनुभव आला. त्यांचे हेलिकॉप्टर पापुआ न्यू गिनीवरून जात असताना त्यांना जंगलात विमानाच्या आकाराची गूढ गोष्ट दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा ही गूढ गोष्ट अमेरिकेचे लढाऊ विमान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसऱ्या महायुद्धात या विमानाचा वापर करण्यात आला होता. दीर्घकाळापासून चिखलात रुतलेले असूनही ते चांगल्या अवस्थेत होते. युद्धाच्या काळात मोहिमेसाठी उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाने खाली दिसणाऱ्या शेतात विमान उतरविण्याचा निर्णय घेतला; परंतु ते शेत नव्हतेच. वैमानिक शेत समजून दलदलीत विमान उतरवीत होते. हे विमान अमेरिकी हवाई दलाचे बी-१७ ई फ्लाइंड फोर्टेस विमान होते. ३० वर्षे उलटल्यानंतर त्याचा छडा लागला.

Web Title: Second World War fighter aircraft found in mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.