अतिरेक्यांची आर्थिक रसद पाकिस्तान तोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:44 AM2018-06-28T04:44:20+5:302018-06-28T04:44:24+5:30

मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या ‘जमात-उद-दावा’संघटनेसह अनेक दहशतवादी संघटनांना मिळणारी

Pakistan will break the financial burden of terrorists | अतिरेक्यांची आर्थिक रसद पाकिस्तान तोडणार

अतिरेक्यांची आर्थिक रसद पाकिस्तान तोडणार

Next

इस्लामाबाद : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या ‘जमात-उद-दावा’संघटनेसह अनेक दहशतवादी संघटनांना मिळणारी आर्थिक रसद तोडण्यासाठी पाकिस्तानने फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या आंतरराष्ट्रीय संघटनेला २६ कलमी कृती आराखडा सादर केला आहे. एफएटीएफने आपल्याला काळ्या यादीत टाकू नये, म्हणून पाकिस्तानने ही पावले उचलली आहेत.
विविध देशांनी एकत्र येऊन एफएटीएफची १९८९ साली स्थापन केली. एफएटीएफच्या नियमांची कडक अंमलबजावणी न करणाऱ्यांत पाकिस्तान आघाडीवर आहे. त्यामुळे त्याला काळ््या यादीमध्ये टाकण्याची तयारी सुरु होती. याचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम पाकिस्तानला टाळायचे आहेत.
एफएटीएफच्या पॅरिसमध्ये सुरू झालेल्या बैठकीत पाकिस्तानने भाग घेतला आणि अल कायदा, जमात-उद-दावा, फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क तसेच तालिबानी संघटनांची आर्थिक रसद तोडण्यासाठी १५ महिने कालावधीचा कृती आराखडा सादर केला.

Web Title: Pakistan will break the financial burden of terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.