पाकिस्तानला डबल दणका, इराणनेही केला हल्ला

By admin | Published: September 30, 2016 10:31 AM2016-09-30T10:31:37+5:302016-09-30T12:22:28+5:30

भारतापाठोपाठ इराण लष्करानेही पाकिस्तानवर हल्ला केल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे पाकिस्तानसाठी गुरुवारचा दिवस डबल दणका देणारा ठरला आहे.

Pakistan has a double bomb, Iran also attacked | पाकिस्तानला डबल दणका, इराणनेही केला हल्ला

पाकिस्तानला डबल दणका, इराणनेही केला हल्ला

Next

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. ३० -' उरी' हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या ' सर्जिकल स्ट्राईक'चा धक्का पचवत असतानाच इराणनेही पाकिस्तानावर हल्ला केल्याने एकाच दिवसात पाकिस्तानला ' डबल' धक्का बसला आहे.  
उरी येथील लष्करी तळावरील हल्ल्यानंतर ११ दिवसांनी लष्कराने बदला घेत बुधवारी मध्यरात्री दहशतवाद्यांना ठेचले. लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरामध्ये घुसून दहशतवाद्यांच्या शिबिरांवर हल्ले केले.
 
या हल्ल्यातून सावरण्याचा वेळही न देता बुधवारीच इराण लष्करानेही इराण-पाकिस्तानच्या सीमारेषेवर पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागातील पंजोर जिल्ह्यात तोफांचा मारा केल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.  इराण लष्कराकडून तीन वेळा तोफांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात कोणतेही नुकसान तसेच जीवितहानी झालेले नसले तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतापाठोपाठ इराणच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मनोधैर्य खचले असणार हे निश्चित..!
 
आणखी बातम्या :
पाकिस्तानमधील आश्रयित दहशतवादी इराणवर वारंवार हल्ले करतात, असा इराणचा आरोप आहे. या दोन्ही देशांमध्ये यापूर्वीही चकमकी घडल्या आहेत. पाकिस्तान व इराणमध्ये २०१४ साली दहशतवादासंबधी करार झाला होता. या करारानुसार दहशतवाद्यांविरोधात एकमेकांच्या सहाय्याने लढा देण्याचे ठरवण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडताना दिसत नाही. 
 

Web Title: Pakistan has a double bomb, Iran also attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.