आता कोणत्याही क्षणी अण्वस्त्र युद्ध : उत्तर कोरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 03:55 AM2017-10-18T03:55:26+5:302017-10-18T03:55:50+5:30

अण्वस्त्र युद्ध आता कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकेल, असा इशारा उत्तर कोरियाचे संयुक्त राष्ट्रांतील उप राजदूत किम इन -योंग यांनी सोमवारी दिला.

Now the nuclear war at any moment: North Korea | आता कोणत्याही क्षणी अण्वस्त्र युद्ध : उत्तर कोरिया

आता कोणत्याही क्षणी अण्वस्त्र युद्ध : उत्तर कोरिया

Next

 संयुक्त राष्ट्रे : अण्वस्त्र युद्ध आता कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकेल, असा इशारा उत्तर कोरियाचे संयुक्त राष्ट्रांतील उप राजदूत किम इन -योंग यांनी सोमवारी दिला. कोरियन द्विपकल्पातील परिस्थिती ही धोक्याची/अनिश्चित अवस्थेला पोहोचली असून कोणत्याही क्षणी अण्वस्त्र युद्धाला तोंड फुटू शकेल, असे ºयोंग यांनी युनोच्या आमसभेच्या नि:शस्त्रीकरण समितीला सांगितले.
ºयोंग म्हणाले, जगात उत्तर कोरिया हा एकमेव देश असा आहे की त्याला अमेरिकेकडून १९७० पासून ‘अशा प्रकारची टोकाची आणि थेट अण्वस्त्राची धमकी’ मिळाली आहे आणि त्यामुळे आमच्या देशाला स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रे बाळगण्याचा हक्क आहे.’’ दरवर्षी अण्वस्त्राचा साठा वापरून मोठ्या प्रमाणावर लष्करी कवायती होत असल्याकडे लक्ष वेधून ºयोंग यांनी आमच्या सर्वोच्च नेतृत्वाला काढून टाकण्याच्या उद्देशाने अमेरिकेने गुप्त कट रचला आहे. यावर्षी उत्तर कोरियाने त्याची अण्वस्त्र शक्ती प्राप्त केली असून पूर्ण स्वरुपात अण्वस्त्रशक्तीधारी देश बनला आहे. त्याच्याकडे वेगवेगळ््या पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अणुबाँब, हायड्रोजन बाँबसह आणि आंतरखंडीय बॅलिस्टीक अग्निबाण सोडण्याची साधने आहेत, असे किम म्हणाले. संपूर्ण अमेरिकेची मुख्यभूमी ही आमच्या माºयाच्या टप्प्यात असून जर अमेरिकेने आक्रमणाचा प्रयत्न केला तर जगाच्या कोणत्याही भागात तो आमच्या कठोर शिक्षेपासून वाचवू शकणार नाही, असा इशारा ºयोंग यांनी दिला. (वृत्तसंस्था)

Web Title: Now the nuclear war at any moment: North Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.