अमेरिकेत उत्तर टेक्सासमध्ये एका घरामध्ये गोळीबार, आठ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:15 AM2017-09-11T10:15:11+5:302017-09-11T10:17:52+5:30

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील प्लानो येथील एका घरात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात आठ जण ठार झाले.

In North America, firing in a house in North Texas, eight people killed | अमेरिकेत उत्तर टेक्सासमध्ये एका घरामध्ये गोळीबार, आठ जण ठार

अमेरिकेत उत्तर टेक्सासमध्ये एका घरामध्ये गोळीबार, आठ जण ठार

Next
ठळक मुद्देपहिला अधिकारी घरात घुसल्यानंतर त्याचा संशियत हल्लेखोराबरोबर सामना झाला

टेक्सास, दि. 11 - अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील प्लानो येथील एका घरात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात आठ जण ठार झाले असून, मृतांमध्ये संशयित हल्लेखोराचाही समावेश आहे. उत्तर टेक्सासमध्ये रविवारी रात्री आठच्या सुमारास हा गोळीबार झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी लगेचच गोळीबाराला प्रत्युत्तर दिले असे प्लानो पोलीस दलाचे प्रवक्ते डेव्हीड टिल्ये यांनी सांगितले. 
पहिला अधिकारी घरात घुसल्यानंतर त्याचा संशियत हल्लेखोराबरोबर सामना झाला. अधिका-याने केलेल्या गोळीबारात संशयित हल्लेखोर ठार झाला. दोन जण जखमी झाले आहेत अशी माहिती टिल्ये यांनी दिली. जखमींच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची तसेच हल्लेखोराची ओळख पटलेली नाही. हल्ल्यामागचे नेमके कारण काय आहे ? ते पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. 
पोलिसांचा तपास सुरु आहे. मृत आणि जखमींमध्ये कोणीही अल्पवयीन नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्लानो शहरासाठी अशा प्रकारचा गोळीबार नवीन आहे. कारण यापूर्वी  शहराने इतका भयानक गोळीबार अनुभवलेला नाही असे टिल्ये यांनी सांगितले. 
अमेरिकेत मागच्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेक निष्पाप नागरीक, लहान मुलांनी आपले प्राण गमावले आहेत. 
 

Web Title: In North America, firing in a house in North Texas, eight people killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.