मसूदच्या ड्रॅगननितीवर नेटीझन्सचा संताप, चीनला केलं ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 12:01 PM2019-03-14T12:01:54+5:302019-03-14T12:02:48+5:30

चीनने व्हिटो पावर वापरुन अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. चीनने दहशतवादी मसूद अजहरची केलेली पाठराखण यावर सोशल मिडीयामध्ये अनेकांना संताप व्यक्त केला

Netizens trolls to China, boycott china trends on twitter | मसूदच्या ड्रॅगननितीवर नेटीझन्सचा संताप, चीनला केलं ट्रोल 

मसूदच्या ड्रॅगननितीवर नेटीझन्सचा संताप, चीनला केलं ट्रोल 

Next

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड मसूज अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याला चीनने विरोध केला. संयुक्त राष्ट्र संघात अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटेनला आणलेल्या प्रस्तावाला चीनने व्हिटो पावर वापरुन अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. चीनने दहशतवादी मसूद अजहरची केलेली पाठराखण यावर सोशल मिडीयामध्ये अनेकांना संताप व्यक्त केला. 

बुधवारी रात्री संयुक्त राष्ट्र परिषदेत मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन या देशांनी पाठिंबा दिला. मात्र चीनने या प्रस्तावाचा विरोध करत भारताच्या प्रयत्नांना खोडा घातला. यानंतर सोशल मिडीयावर चीनच्या विरोधात अनेक संतापाचे संदेश व्हायरल झाले. आता ट्विटरवर #BoyottChineseProduct असा ट्रेंड सुरु आहे. 



 



 

सोशल मिडीया युजर्सकडून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा असं आवाहन करण्यात येत आहे. त्याचसोबत #ChinaSupportsTerrorism असाही ट्रेड युजर्सकडून वापरुन चीनचा विरोध करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघात मसूद अजहरच्या विरोधातील हा चौथा प्रस्ताव आहे. याआधीही चीनने या प्रस्तावाला विरोध केला आहे. 



 

चीनने याआधी 2009, 2016 आणि 2017 या साली मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला व्हिटो पावरचा वापर करुन विरोध केला होता. प्रत्येक वेळी चीनच्या विरोधात ट्विटरवर ट्रेंडींग होते.   

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. जानेवारी 2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेवर बंदी आणण्यसाठी जोरदार हालचाली सुरु ठेवल्या होत्या. मात्र नेहमीप्रमाणे चीनकडून भारताच्या प्रस्तावाला विरोध करण्यात येतो. 
 

Web Title: Netizens trolls to China, boycott china trends on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.