मंगळाच्या दिशेने सोडलेली मोटार अंतराळात भरकटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 03:41 AM2018-02-09T03:41:51+5:302018-02-09T03:42:18+5:30

इलॉन मस्क या अब्जाधीश अमेरिकी उद्योगपतीच्या स्पेसएक्स कंपनीने मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घालण्यासाठी पाठविलेली ‘टेस्ला रोडस्टर’ ही स्पोर्ट््स कार मार्गभ्रष्ट होऊन अंतराळात भरकटली आहे.

The motorized motorcycle crossed the space! | मंगळाच्या दिशेने सोडलेली मोटार अंतराळात भरकटली!

मंगळाच्या दिशेने सोडलेली मोटार अंतराळात भरकटली!

Next

केप कॅनेव्हरल (कॅलिफोर्निया): इलॉन मस्क या अब्जाधीश अमेरिकी उद्योगपतीच्या स्पेसएक्स कंपनीने मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घालण्यासाठी पाठविलेली ‘टेस्ला रोडस्टर’ ही स्पोर्ट््स कार मार्गभ्रष्ट होऊन अंतराळात भरकटली आहे.
ही कार मंगळाची कक्षा ओलांडून सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या उल्का व अशनींच्या पट्ट्यात शिरली असून ती कुठवर पोहोचेल, कुठे जाऊन स्थिरावेल, बाह्य अवकाशाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत किती काळ टिकेल, याविषयी अनिश्चितता आहे. इलॉन मस्क यांनी ही माहिती देताना लिहिले की, मूळ योजनेनुसार ही स्पोर्ट््स कार व आतील डमी ड्रायव्हर यांना मंगळ-पृथ्वी यांच्या दरम्यानच्या कक्षेत जायचे होते. पण ही कार इच्छित मार्ग सोडून पुढे आणखी सुदूर अंतराळात जात आहे. ग्रहमालेला लागून असलेल्या उल्का आणि अशनींनी भरलेल्या पट्ट्याच्या दिशेने ती जात आहे. रॉकेटच्या इंजिनाचा अपेक्षेहून जास्त रेटा मिळाल्याने असे झाले असावे. (वृत्तसंस्था)
>कुठे जाणार हे अनिश्चित
अंंतराळात सोडलेल्या या स्पोर्ट््स कारच्या नेमक्या भ्रमणमार्गाचा नकाशा स्पेसएक्स कंपनीने जाहीर केलेला नाही. त्यामुळे ती नेमकी कुठपर्यंत जाऊन पोहोचेल याचा अंदाज करणे कठीण आहे. ग्रहमालेतील परस्परांना छेद देणा-या गुरुत्वाकर्षण कक्षांच्या ओढाताणीने ती नेमकी कुठे स्थिरावेल हेही अनिश्चित आहे. परंतु असंख्य उल्का आणि अशनींनी भरलेल्या पट्ट्यातून जाताना तिची त्यापैकी एकाशी टक्कर होणे किती काळ टळेल याची अटकळ करणेही अशक्य आहे.

Web Title: The motorized motorcycle crossed the space!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.