‘वान्नाक्राय’ व्हायरसपासून जगाला वाचवणा-याला एफबीआयने केली अटक

By sagar.sirsat | Published: August 5, 2017 07:46 AM2017-08-05T07:46:26+5:302017-08-05T07:52:35+5:30

मे महिन्यात जगभरात खळबळ उडवणा-या ‘वॉनाक्राय रॅन्समवेअर’ला रोखण्याचं काम मार्कसने करून दाखवलं. तेव्हापासून त्याची जगाला ओळख झाली होती.

Marcus Hutchins wannacry kronos malware arrest | ‘वान्नाक्राय’ व्हायरसपासून जगाला वाचवणा-याला एफबीआयने केली अटक

‘वान्नाक्राय’ व्हायरसपासून जगाला वाचवणा-याला एफबीआयने केली अटक

Next
ठळक मुद्दे ‘वान्नाक्राय’ सारखा खतरनाक व्हायरस रोखणा-या मार्कस हचिन्स या सायबर सिक्युरिटी रिसर्चरला अमेरिकेची तपास यंत्रणा  एफबीआयने अटक केली‘क्रोनोस बॅंकिंग ट्रोझनची निर्मीती करण्याचा आणि त्याचे वितरण करण्याचा आरोप मे महिन्यात जगभरात खळबळ उडवणा-या ‘वॉनाक्राय रॅन्समवेअर’ला रोखण्याचं काम मार्कसने करून दाखवलं. तेव्हापासून त्याची जगाला ओळख झाली होती.

वॉशिंग्टन, दि. 5 - ‘वान्नाक्राय’ सारखा खतरनाक व्हायरस रोखणा-या मार्कस हचिन्स या सायबर सिक्युरिटी रिसर्चरला अमेरिकेची तपास यंत्रणा  एफबीआयने अटक केली आहे. बॅंकिंग सिस्टीमला हॅक करू शकणारं 'मालवेअर' बनवण्याच्या आरोपाखाली 23 वर्षीय हचिन्स याला अटक करण्यात आली आहे. लास वेगास येथे त्याला अटक करण्यात आली. 

सायबर सिक्युरिटीचा रिसर्चर असलेला मार्कस याच्यावर ‘क्रोनोस बॅंकिंग ट्रोझनची निर्मीती करण्याचा आणि त्याचे वितरण करण्याचा आरोप आहे. या वर्षी मे महिन्यात ‘वॉनाक्राय रॅन्समवेअर’चा जवळपास दीडशे देशांना फटका बसला होता. त्यावेळी जवळपास 300 कम्प्युटर्समध्ये या व्हायरसने शिरकाव केला होता आणि बीटकॉइन्सद्वारे पैशांची मागणी करण्यात आली होती. जगभरात खळबळ उडवणा-या या व्हायरसला रोखण्याचं काम मार्कसने करून दाखवलं. तेव्हापासून त्याची जगाला ओळख झाली होती. मार्कस हचिन्सला क्रोनोस बॅकिंग ट्रोझन हे बॅंकिंग सिस्टीमला हॅक करू शकणारं मालवेअर बनवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. जुलै 2014 ते जुलै 2015 या कालावधीत त्याने हे मॅलवेअर तयार केलं होतं असं सांगितलं जातं.

मार्कसला अटक झाल्यामुळे अनेक सायबर तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर अनेकजण मार्कसचं समर्थन करत आहेत. क्रोनोस ट्रोझन  मालवेअरच्या वितरणासाठी मार्कसला आणखी एका व्यक्तीने मदत केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अजून त्या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

Web Title: Marcus Hutchins wannacry kronos malware arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.