स्थलांतरितांना प्रेमाने आश्रय द्या, पोप यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 04:01 AM2017-12-26T04:01:18+5:302017-12-26T04:02:39+5:30

व्हॅटिकन सिटी : विपरित परिस्थितीमुळे ज्यांना घरदार सोडून स्थलांतर करावे लागले, अशा लोकांना प्रेमाने आश्रय देणे ही ख्रिश्चन धर्माची शिकवण आचरणात आणणे आजच्या स्थितीत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जगभरातील रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी केले.

Love the migrants with love, the Pope's appeal | स्थलांतरितांना प्रेमाने आश्रय द्या, पोप यांचे आवाहन

स्थलांतरितांना प्रेमाने आश्रय द्या, पोप यांचे आवाहन

googlenewsNext

व्हॅटिकन सिटी : विपरित परिस्थितीमुळे ज्यांना घरदार सोडून स्थलांतर करावे लागले, अशा लोकांना प्रेमाने आश्रय देणे ही ख्रिश्चन धर्माची शिकवण आचरणात आणणे आजच्या स्थितीत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जगभरातील रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी केले.
रविवारी मध्यरात्री नाताळाच्या विशेष प्रार्थनेसाठी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये जमलेल्या हजारो भाविकांना संदेश देताना, भगवान येशूच्या जन्मापूर्वी जोसेफ आणि मेरी यांनाही बेथलहॅममध्ये असेच विस्थापितांसारखे दारोदार फिरावे लागले होते, पण साध्याभोळ््या मेंढपाळांनाच प्रेषित येशूची खरी ओळख पटली, याचेही त्यांनी स्मरण दिले. जगातील अनेक देशांमधून युद्ध आणि यादवी यामुळे लाखो विस्थापितांचे लोंढे युरोपीय देशांमध्ये येऊन सामाजिक तणाव निर्माण झाले, त्याचा पोप यांच्या या आवाहनाशी संदर्भ होता. (वृत्तसंस्था)
>सांताक्लॉजची माहिती देणारा ट्रॅकर परतला
सॅन फ्रान्सिस्को : नाताळच्या भेटी देणारा सांताक्लॉज नेमका कुठे आहे व तो देणार असलेल्या भेटीचे ठिकाण कोणते, याची माहिती मुलांना देणारा सांताट्रॅकर परतला आहे. गेल्या १३ वर्षांपासून तो मुलांच्या सेवेत आहे. वेब ब्राउझर्स, मोबाइल वेब ब्राउझर्स, अँड्रॉइड टीव्ही, क्रोमकास्ट आणि अँड्रॉइड अ‍ॅपद्वारे सांता आणि त्याच्या रुडोल्फच्या हालचाली रविवारी दाखविण्यात आल्या. सांताचे ठिकाण गुगल पिक्सेल किंवा गुगल होम डिव्हाइसद्वारेही एखाद्याला माहिती करून घेता येईल. जगभर नाताळच्या काय-काय परंपरा आहेत, हेदेखील शिकण्यास हे ट्रॅकर मदत करते.

Web Title: Love the migrants with love, the Pope's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.