इस्रायलनं हुतींच्या हल्ल्यांवर तोडगा शोधला, आता मित्र भारतासोबत असा चालणार व्यापार; काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 06:47 PM2024-01-25T18:47:50+5:302024-01-25T18:50:21+5:30

यामुळे इस्रायलमधून भारतात येणाऱ्या अथवा भारताकडून इस्रायलला जाणाऱ्या वस्तूंना हुथी बंडखोरांच्या हल्ल्याचा धोका राहणार नाही.

Israel found a solution to Houthi attacks, now plans to transport goods from india via uae | इस्रायलनं हुतींच्या हल्ल्यांवर तोडगा शोधला, आता मित्र भारतासोबत असा चालणार व्यापार; काय आहे प्लॅन?

इस्रायलनं हुतींच्या हल्ल्यांवर तोडगा शोधला, आता मित्र भारतासोबत असा चालणार व्यापार; काय आहे प्लॅन?

भारतासोबत व्यापार सुरू ठेवण्यासाठी इस्रायलने एक नवा मार्ग शोधून काढला आहे. यामुळे इस्रायलमधूनभारतात येणाऱ्या अथवा भारताकडून इस्रायलला जाणाऱ्या वस्तूंना हुथी बंडखोरांच्या हल्ल्याचा धोका राहणार नाही. गाझा पट्टीतील हल्ल्यांमुळे लाल समुद्रातून जाणाऱ्या इस्रायली जहाजावर हुती बंडखोर हल्ला करत आहेत. अशा परिस्थितीत इस्रायलने आता भारतासोबत व्यापारासाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) मार्गे माल वाहतूक करण्याची योजना आखली आहे. मात्र यासंदर्भात  यूएईच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.

काय म्हणाले इस्रायली ट्रांसपोर्ट मिनिस्टर -
इस्रायली परिवहनमंत्री मिरी रेगेव यांनी एक्सवर बोलोताना म्हटले आहे की, "आम्ही अबू धाबी ते इस्रायलपर्यंत जमिनी मार्गाने माल वाहतूक करण्यासाठी व्यावसायिक संघ स्थापन केले आहेत. यामुळे लागणारा वेळ 12 दिवसांनी कमी होईल. तसेच हूती हल्ल्यांच्यां समस्येमुळे लागणारा वेळही मोठ्या प्रमाणावर कमी होईल. आम्ही हे करू आणि आम्ही यशस्वी होऊ.” मात्र, यूएई ते इस्रायलपर्यंत माल वाहतुकीसाठी कोणत्या मार्गाचा वापर केला जाईल, यासंदर्भात मिरी रेगेव्ह यांनी माहिती दिली नाही. 

इस्रायली जहाजांवर का हल्ले करतात हुती -
इस्रायलशी संबंध असल्याचा संशय असलेल्या व्यावसायिक जहाजांवरील हुतींच्या हल्ल्यांदरम्यान लाल समुद्रातील तणाव वाढला आहे. हुतींचे म्हणणे आहे की, इस्रायलवर गाझा पट्टीतील आक्रमक हल्ले थांबविण्यासाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने हे हल्ले केले जात आहेत. 

इस्रायलने 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर, गाझा पट्टीवर हल्ले सुरू केले आहेत. हमासच्या नियंत्रणाखाली असलेल्या गाझाच्या आरोग्य विभागाने दावा केला आहे की, इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 25,295 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृत्यूच्या या आकड्यासंदर्भात इस्रायलने शंका व्यक्त केली आहे.

Web Title: Israel found a solution to Houthi attacks, now plans to transport goods from india via uae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.