400 सेकेंदांत इस्रायलमध्ये धडकलं इराणचं हायपरसोनिक मिसाइल, आयरन डोमही ठरलं फेल! अशी आहे 'खासियत'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 02:09 PM2024-04-16T14:09:20+5:302024-04-16T14:09:53+5:30

...अर्थात हे मिसाइल इराणमधून लॉन्च केल्यास तेल अवीव पर्यंत केवळ 400 सेकंदांत पोहोचेल. अर्थात केवळ सडे 6 मिनिटांत.

Iran's hypersonic missile fatah hit Israel in 400 seconds, Iron Dome also failed! Such is the 'specialty' | 400 सेकेंदांत इस्रायलमध्ये धडकलं इराणचं हायपरसोनिक मिसाइल, आयरन डोमही ठरलं फेल! अशी आहे 'खासियत'

400 सेकेंदांत इस्रायलमध्ये धडकलं इराणचं हायपरसोनिक मिसाइल, आयरन डोमही ठरलं फेल! अशी आहे 'खासियत'

इरानने 13 एप्रिल 2024 रोजी इस्रायलवर हल्ला मिसाइल हल्ला केला. यापूर्वी इराणने आपल्या मुख्य शहरांमधील इमारतींवर हायपरसोनिक मिसाइलचे होर्डिंग्स लावले होते आणि यावर, 400 सेकेंदांत तेल अवीव, असे लिहिले होते. अर्थात हे मिसाइल इराणमधून लॉन्च केल्यास तेल अवीव पर्यंत केवळ 400 सेकंदांत पोहोचेल. अर्थात केवळ सडे 6 मिनिटांत. 'फतह' असे या मिसाइलचे नाव आहे.

हे मध्यम पल्ल्याचे मिसाइल आहे. याची रेंज 1400 किलोमीटर एवढी आहे. याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 15 पट अधिक आहे. म्हणजेच ताशी 17.9 हजार किलोमीटर. खरे तर, अनेकांना वाटत होते की इस्रायलचे आयर्न डोम आणि इतर हवाई संरक्षण यंत्रणा इराणचे सात बॅलिस्टिक मिसाइल रोखू शकणार नाही. ते फतह हायपरसॉनिक मिसाईल होते. ज्याला इस्रायलची कोणतीही हवाई संरक्षण यंत्रणा रोखू शकली नाही. हेच सात मिसाइल्स इस्रायलच्या नेवाटीम एअरबेसवर पडले.

इराणच्या हायपरसोनिक मिसाइल पुढे आयरन डोम फेल -
इराणने ड्रोन्स आणि रॉकेट्सच्या सहाय्याने इस्रायलवर जवळपास सोबतच हल्ला केला. याच वेळी, इस्रायली डिफेंस फोर्सेस, अमेरिकन नौदलाची विमानवाहू युद्धनौका आणि इस्रायली आयरन डोम यांनी हे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले. मात्र तरीही इराणच्या हायपरसोनिक मिसाइल्सनी इस्रायलचे रक्षण कवच भेदले. हे सर्व आपल्या टार्गेटवर पडले.

अशी आहे इराणच्या हायपरसोनिक मिसाइलची 'खासियत' - 
फतह हे एक मध्यम पल्ल्याचे हायपरसोनिक मिसाइल आहे. यात 350 ते 450 किलो वजनाचे वॉरहेड बसवले जाते. या मिसाइलसाठी सॉलिड इंधनाचा वापर केला जातो. याची रेंज 1400 किमी एवढी आहे. तर वेग 16,052 किमी/तास ते 18,522 किमी/तास एवढा आहे. महत्वाचे म्हणजे, हे मिसाइल केव्हाही कोणत्याही दिशेला वळवले जाऊ शकते. अर्थात टार्गेट मिस होऊच शकत नाही. तसेच हे मिसाईल सहजपणे कुठल्याही रडारच्या नजरेत येत नाही.

Web Title: Iran's hypersonic missile fatah hit Israel in 400 seconds, Iron Dome also failed! Such is the 'specialty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.