Indo-Pak sexual harassment is painful, United Nations expressed concern | भारत, पाकमधील लैंगिक अत्याचार वेदनादायी, संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता

संयुक्त राष्ट्रे : भारत आणि पाकिस्तानात अलीकडच्या काळात मुलींवर झालेले लैंगिक अत्याचार वेदनादायी असल्याचे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केले आहे. शिक्षण आणि महिला सशक्तीकरण याद्वारे यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न जागतिक स्तरावर केला जात आहेत, असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनिया गुटारेस यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी म्हटले आहे.
मागील आठवड्यात नवी दिल्ली येथे आठ वर्षीय मुलीवर एका २८ वर्षीय नातेवाइकाने बलात्कार केला होता. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानातही गेल्या महिन्यात एका सात वर्षीय मुलीचा बलात्कार करुन खून करण्यात आला होता. त्यानंतर तिथे अनेक मोर्चे निघाले होते.
या पार्श्वभूमीवरस्टिफन दुजारिक म्हणाले की, या दोन्ही घटना अतिशय वेदनादायी आहेत. ते म्हणाले की, कोणताही देश महिलांवरील अत्याचारापासून क्त नाही. अगदी जगात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर भागात कुठेही पाहिले तरी महिला अत्याचाराचे चित्र पाहावयास
मिळत आहे. ही चिंतेची बाब आहे. (वृत्तसंस्था)

महिलांच्या सन्मानासाठी...

महिलांच्या सन्मानासाठी यूएनएफपीए, युनिसेफ आणि इतर संघटना काम करत आहेत. महिलांना समान अधिकारांसाठी हा प्रयत्न आहे. त्यांना आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात हा हेतू आहे. एकूणच महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.