कोरोनानंतर 'या' व्हायरसने वाढवलं WHO चं टेन्शन; 'ही' आहेत लक्षणं, अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:48 PM2024-01-03T17:48:12+5:302024-01-03T17:48:42+5:30

कोरोनासोबतच आता आणखी एका व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे, ज्यामुळे WHO ची चिंता वाढली आहे.

health tips wee diseases symptoms and prevention | कोरोनानंतर 'या' व्हायरसने वाढवलं WHO चं टेन्शन; 'ही' आहेत लक्षणं, अशी घ्या काळजी

कोरोनानंतर 'या' व्हायरसने वाढवलं WHO चं टेन्शन; 'ही' आहेत लक्षणं, अशी घ्या काळजी

कोरोनासोबतच आता आणखी एका व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे, ज्यामुळे WHO ची चिंता वाढली आहे. हा एक दुर्मिळ व्हायरस आहे, जो अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं जातं. अर्जेंटिनाच्या इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन नॅशनल फोकल पॉइंट (IHR NFP) ने WHO ला वेस्टर्न इक्विन एन्सेफलायटीस (WEE) इंफेक्शनच्या एका केसबद्दल माहिती दिली आहे. दोन दशकांनंतर नोंदवलेले हे पहिले मानवी प्रकरण आहे. अर्जेंटिनामध्ये 1982, 1983 आणि 1996 मध्ये WEE ची मानवी प्रकरणे शेवटची नोंदवली गेली. हा व्हायरस नेमका काय आहे आणि तो किती धोकादायक आहे हे जाणून घेऊया...
 
WEE व्हायरस काय आहे?

WEE हा दुर्मिळ डासांमुळे पसरणारा व्हायरस आहे. ज्याचा परिणाम घोडा आणि मानवांवर जास्त होतो. हा व्हायरस संक्रमित पक्ष्यांकडून मानवापर्यंत पोहोचतो. हा व्हायरस स्थलांतरित पक्ष्यांमधून मानवांमध्ये येतो. पक्ष्यांमुळे हा व्हायरस इतर देशांमध्ये पसरू शकतो.
 
WEE व्हायरसची लक्षणं काय आहेत?

WHO च्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, 19 नोव्हेंबर 2023 रोजी WEE ची लागण झालेल्या रुग्णामध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा आणि ताप यांसारखी लक्षणे दिसून आली. यानंतर, रुग्णाला 24 नोव्हेंबर 2023 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला सुमारे 12 दिवस वेंटिलेशनवर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर 20 डिसेंबरला रुग्णाला रुग्णालयातून सोडण्यात आले. 
 
असा करा बचाव

1. हात आणि पाय चांगले झाकून ठेवा.
2. घरातील कोणी आजारी पडल्यास त्याची काळजी घ्या.
3. DEET, IR3535 किंवा Icaridin असलेली उत्पादने वापरू नका.
4. दारे आणि खिडक्या घट्ट बंद ठेवा.
5. मच्छरदाणीशिवाय झोपू नका.
6. डास टाळण्यासाठी घरात कीटकनाशकाची फवारणी करा.
7. गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या.
 

Web Title: health tips wee diseases symptoms and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.