इस्रायल-हमास युद्धात फेसबुक, इन्स्टाग्रामला २४ तासांचा अल्टिमेटम; नक्की प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:19 PM2023-10-12T23:19:25+5:302023-10-12T23:20:59+5:30

या अल्टिमेटमनंतर, मेटा कडून एक विशेष टीम बनवण्यात आली आहे

European union warning Facebook instagram to remove hamas supported post content in 24 hours ultimatum | इस्रायल-हमास युद्धात फेसबुक, इन्स्टाग्रामला २४ तासांचा अल्टिमेटम; नक्की प्रकरण काय?

इस्रायल-हमास युद्धात फेसबुक, इन्स्टाग्रामला २४ तासांचा अल्टिमेटम; नक्की प्रकरण काय?

Israel Hamas War, Facebook Instagram: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनने (EU) फेसबुक आणि इन्स्टाग्रामला अल्टिमेटम दिला आहे. युरोपियन युनियनने फेसबुक आणि इंस्टाग्रामचे मालक मेटाला 24 तासांची मुदत दिली आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सर्व हमास समर्थित पोस्ट हटवाव्या असे अल्टिमेटममध्ये म्हटले आहे. या प्रकरणी मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना पत्र लिहून फेसबुक आणि इन्स्टाग्रामने हमासशी संबंधित पोस्टबाबत सतर्क राहावे, असे म्हटले आहे. या पत्रात, मेटाला इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान दहशतवाद आणि द्वेषयुक्त भाषणाचे समर्थन करणाऱ्या पोस्ट हटविण्यास सांगितले आहे. असे न झाल्यास, त्या बाबी नवीन EU नियमांचे उल्लंघन मानले जाईल. तसेच झुकेरबर्गला येत्या २४ तासांत या नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे.

सांगण्यात आले आहे की, कंपनीने या संदर्भात एक टीम तयार केली आहे, ज्यामध्ये हिब्रू आणि अरबी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश आहे. हे लोक हमास-समर्थित पोस्ट ओळखण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी कार्य करतील. मेटाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडून काम केले जात आहे. तसेच, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या साहित्यावर कारवाई केली जात आहे, ज्यामुळे चुकीची माहिती पसरवण्यापासून थांबवण्यास मदत होईल. यासाठी त्यांची टीम 24 तास कार्यरत आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: European union warning Facebook instagram to remove hamas supported post content in 24 hours ultimatum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.