श्रीलंकेत आणीबाणी; मृतांची संख्या २९०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 06:11 AM2019-04-23T06:11:17+5:302019-04-23T06:11:27+5:30

श्रीलंकेतील रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर देशात सोमवारी रात्रीपासून आणीबाणी लागू झाली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक अधिकार मिळतील

Emergency in Sri Lanka; Number of dead | श्रीलंकेत आणीबाणी; मृतांची संख्या २९०

श्रीलंकेत आणीबाणी; मृतांची संख्या २९०

Next

कोलंबो : श्रीलंकेतील रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर देशात सोमवारी रात्रीपासून आणीबाणी लागू झाली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक अधिकार मिळतील. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काल ८ ठिकाणी घडवून आणण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांत मरण पावलेल्यांची संख्या २९० झाली असून, ५०० लोक जखमी झाले आहेत. त्यात कर्नाटकचे ५ जण आहेत. आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला घडवून आणला. या प्रकरणी २४ जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांत आठ भारतीयांचा समावेश आहे. या हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’ या संघटनेचा हात असल्याची शंका श्रीलंकेतील मंत्री रजिता सेनारत्ने यांनी व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Emergency in Sri Lanka; Number of dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.