ग्रहणातील सूर्यालाही डोनाल्ड ट्रम्पनी वटारले उघड्या डोळ्यांनी, सोशल मीडियावर खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:34 PM2017-08-22T12:34:46+5:302017-08-22T12:41:56+5:30

सुर्यग्रहण पाहताना एक महत्वाचा नियम असतो तो म्हणजे पुर्वकाळजी न घेता आकाशाकडे पाहू नये

Donald Trump look into the sky during the solar eclipse | ग्रहणातील सूर्यालाही डोनाल्ड ट्रम्पनी वटारले उघड्या डोळ्यांनी, सोशल मीडियावर खिल्ली

ग्रहणातील सूर्यालाही डोनाल्ड ट्रम्पनी वटारले उघड्या डोळ्यांनी, सोशल मीडियावर खिल्ली

Next

वॉशिंग्टन, दि. 22 - सुर्यग्रहण पाहताना एक महत्वाचा नियम असतो तो म्हणजे पुर्वकाळजी न घेता आकाशाकडे पाहू नये. चष्मा न वापरता सुर्यग्रहण पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येऊ शकतं असं शास्त्रज्ञ सांगतात. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शास्त्रज्ञांचा दावा खोडून काढत आपण काहीही करु शकतो हे दाखवून दिलं आहे. सुर्यग्रहण पाहण्यासाठी पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या बाल्कनीत आले असता त्यांनी थेट सुर्याकडे पाहत नजर भिडवली. इतकंच नाही तर तिथे उपस्थित समर्थकांनाही आपण पाहत असल्याचा इशारा करत होते. 

सुर्यग्रहण पाहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आले तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया आणि मुलगा बॅरॉन ट्रम्प उपस्थित होता. मेलिनिया यांनी चष्मा घातलेला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी येताच समर्थकांनी हात दाखवत थेट आकाशाकडे पाहिले. आपण आकाशाकडे पाहत असल्याचं ते इशा-याने सांगतही होते. बरं एकदा तर तीनवेळा त्यांनी हे धैर्य करुन दाखवलं. नंतर मात्र त्यांनी डोळ्यांवर चष्मा घालून पत्नी आणि मुलासोबत संपुर्ण सुर्यग्रहण पाहिलं. 

डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर मात्र चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. 




सोमवारी (२१ ऑगस्ट) श्रावण अमावास्येच्या दिवशी अमेरिकेतील चौदा राज्यातून सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसली. त्यासाठी अमेरिकेच्या इतर भागातून आणि जगातून अनेक खगोलप्रेमी अमेरिकेतील या चौदा राज्यांत सूर्यग्रहणातील छायाप्रकाश लहरी, डायमंड रिंग, प्रभाकिरिट ( करोना ) , भर दिवसा होणा-या अंधारात घडणारे ग्रह- तारकांचे दर्शन इत्यादी सुंदर अविष्कार पाहण्यासाठी एकत्र आले होते.  


या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती अमेरिकेच्या ओरेगॉन ,इडाहो,व्योमिंग, मोंटाना,इओवा, कॅनसन्स, नेब्रास्का,मिसौरी, इलिनोइस, केनटकी,टेनेसा,जार्जिया, उत्तर करोलिना आणि दक्षिण करोलिना या चौदा राज्यातून  दिसली. ब-याच कालावधीनंतर अमेरिकेच्या मोठ्या भागातून हे खग्रास सूर्यग्रहण दिसल्याने खगोलप्रेमीनी त्या भागांत गर्दी केली होती. विमान कंपन्यांनी प्रचंड भाडेवाढ केली होती, खग्रास पट्ट्यातील हॉटेल्सनीही  भाडे दुप्पट केले होते. ग्रहण पाहण्याचे चष्मे सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आले होते.  त्यामुळे सोमवारी 21 ऑगस्ट रोजी अमेरिकेत मोठा ' सूर्यग्रहणोत्सव ' साजरा झाला. यासाठीची पूर्वतयारी खूप अगोदरपासून करण्यात आली होती. 

भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी २६ डिसेंबर २०१९ रोजी मिळणार आहे. तसेच  खग्रास सूर्यग्रहण भारतातून २० मार्च २०३४ रोजी काश्मीरमधून दिसणार आहे.

Web Title: Donald Trump look into the sky during the solar eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.