दाम्पत्याला जाळले; पाकमध्ये ५९ दोषी

By admin | Published: December 25, 2014 01:44 AM2014-12-25T01:44:29+5:302014-12-25T01:44:29+5:30

पवित्र कुराणचा अवमान केल्याच्या आरोपावरून ख्रिश्चन दाम्पत्याला जिवंत जाळण्याच्या घटनेसंदर्भात पाकिस्तानात ५९ जणांना दोषी ठरविण्यात आले

The couple was burnt to death; 59 convicts in Pak | दाम्पत्याला जाळले; पाकमध्ये ५९ दोषी

दाम्पत्याला जाळले; पाकमध्ये ५९ दोषी

Next

लाहोर : पवित्र कुराणचा अवमान केल्याच्या आरोपावरून ख्रिश्चन दाम्पत्याला जिवंत जाळण्याच्या घटनेसंदर्भात पाकिस्तानात ५९ जणांना दोषी ठरविण्यात आले असून, त्यात चार महिला व दोन धर्मगुरूआहेत. ४ नोव्हेंबर रोजी शाहजाद मसिह (३५) व त्यांची गर्भवती पत्नी सियामा ऊर्फ शमा (३१) यांना संतप्त जमावाने मारहाण करून वीटभट्टीत फेकले होते. पोलीस येऊन जमावाला पांगवेपर्यंत त्यांची जळून राख झालेली होती. कसूर जिल्ह्यातील कोट राधाकिशन येथे हल्ला झाला होता. लाहोर येथील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्या. हरून लतीफ यांनी या प्रकरणी ५९ जणांवर आरोपपत्र ठेवले आहे. पाकिस्तानात ख्रिश्चन नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारापैकी हे एक प्रकरण आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The couple was burnt to death; 59 convicts in Pak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.