कमांडर इशाकला सोडले

By admin | Published: December 24, 2014 03:25 AM2014-12-24T03:25:36+5:302014-12-24T03:25:36+5:30

लष्कर ए झांगवी या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा प्रमुख मलिक इशाक याची तीन वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुक्तता झाली

Commander left of Ishaqa | कमांडर इशाकला सोडले

कमांडर इशाकला सोडले

Next

लाहोर : लष्कर ए झांगवी या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा प्रमुख मलिक इशाक याची तीन वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुक्तता झाली असून, पाक सरकारने त्याची शिक्षा वाढविण्यासंदर्भात काहीच हालचाली न केल्यामुळे तो आता मुक्त फिरणार हे स्पष्ट झाले आहे. मलिक इशाक याच्यावर २००९ साली श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंवर हल्ला करणे, तसेच अल्पसंख्य शियांवर हल्ले करणे, असे आरोप आहेत. २०१३ साली लष्कर ए झांगवीने क्वेट्टा येथे शिया नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात २०० लोक ठार झाले होते.
शांतता व सुरक्षा कायद्याखाली मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लखवी याला तसेच इशाक याला पकडण्यात आले होते; पण लखविला जामीन मंजूर झाला असून, इशाकची सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने इशाकला जुलै २०११ मध्ये जामीन दिला होता; पण कायदा व सुरक्षा कायद्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नवाज शरीफ एकीकडे दहशतवाद्यांचा बीमोड करण्याच्या वल्गना करत असून, दुसरीकडे दहशतवादी मोकळे सोडले जात आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Commander left of Ishaqa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.