लवकरच युद्धविराम... हमासचा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 05:46 AM2023-11-22T05:46:16+5:302023-11-22T05:46:40+5:30

इस्रायलने हल्ल्याचा बदला म्हणून युद्धाची घोषणा करीत बॉम्बफेक आणि जमिनीवर आक्रमण सुरू केले आहे.

Cease fire soon... Hamas' new claim | लवकरच युद्धविराम... हमासचा नवा दावा

लवकरच युद्धविराम... हमासचा नवा दावा

दोहा (कतार) : इस्रायलशी युद्धविराम कराराच्या जवळ पोहोचलो आहोत, असा दावा हमासचे नेते इस्माईल हनीयेह यांनी मंगळवारी टेलीग्रामवर पोस्ट केलेल्या निवेदनात केला आहे. त्याअंतर्गत इस्रायलवरील इतिहासातील सर्वात प्राणघातक हल्ल्यादरम्यान ७ ऑक्टोबर रोजी अपहरण करून ओलीस ठेवलेल्या सुमारे २४० इस्रायली नागरिकांची सुटका करण्याच्या एका करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

इस्रायलने हल्ल्याचा बदला म्हणून युद्धाची घोषणा करीत बॉम्बफेक आणि जमिनीवर आक्रमण सुरू केले आहे. गाझामधील हमास सरकारच्या म्हणण्यानुसार, युद्धात १३,३०० हून अधिक लोक मारले गेले आहेत, त्यात हजारो लहान मुलांचा समावेश आहे. कतारने या युद्धात मध्यस्थी केली आहे.

Web Title: Cease fire soon... Hamas' new claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :warयुद्ध