पकडला गेला आणि आता बोलताही येईना, चीनमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 06:16 AM2018-01-10T06:16:19+5:302018-01-10T06:16:53+5:30

चीनमधील ही घटना. झेंग आडनावाच्या एका इसमानं काही रकमेसाठी आपल्या पत्नीच्या काकांची हत्या केली. हत्या कोणी केली, हे पोलिसांना समजलं. त्यामुळे त्याला लपून बसणं गरजेचं होतं. तो ७७ किलोमीटर अंतरावरील एका गावात गेला आणि बांधकाम मजूर म्हणून काम करू लागला.

Caught and now I do not even speak, events in China | पकडला गेला आणि आता बोलताही येईना, चीनमधील घटना

पकडला गेला आणि आता बोलताही येईना, चीनमधील घटना

Next

चीनमधील ही घटना. झेंग आडनावाच्या एका इसमानं काही रकमेसाठी आपल्या पत्नीच्या काकांची हत्या केली. हत्या कोणी केली, हे पोलिसांना समजलं. त्यामुळे त्याला लपून बसणं गरजेचं होतं. तो ७७ किलोमीटर अंतरावरील एका गावात गेला आणि बांधकाम मजूर म्हणून काम करू लागला. हे करताना आपल्याला बोलता येत नाही, आपण मुके आहोत, असं त्यानं भासवलं. तिथल्या मुकादमानं तेथील एका महिलेशी याचा विवाहही लावून दिला. तिथं १२ वर्षं आयुष्य शांतपणे चाललं असतानाच, सरकारनं घरोघरी जाऊ न प्रत्येकाचा सर्व्हे करण्याची मोहीम आखली. ती सुरू असताना, झेंगकडे कोणतंही ओळखपत्र नसल्याचं लक्षात आलं. शिवाय आपण मुके आहोत, असं तो भासवत असल्यानं त्याच्याकडून माहिती मिळवणंही अवघड होतं. त्यामुळे सर्व्हे करणाºया अधिकाºयांनी त्याचं रक्त तपासण्याचा निर्णय घेतला. शिवाय त्यातून डीएनए टेस्ट करायचंही ठरवलं. त्या टेस्टमधून १२ वर्षं मुकेपणाचं सोंग घेतलेल्या झेंगचं बिंगच फुटलं. त्याची खरी ओळख पटल्यानं पोलिसांनी त्याला अटक केली. ती पटल्यावर त्याची जबानी घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. पण तब्बल १२ वर्षं न बोलल्यानं त्याला खरोखर बोलताच येईना. म्हणजे शिक्षाही झाली आणि वाणीही गेली.

Web Title: Caught and now I do not even speak, events in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक