पाकिस्तानात शिया मुस्लिमांच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोट, तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 04:44 PM2021-08-19T16:44:42+5:302021-08-19T16:46:02+5:30

माध्यमांतील वृत्तांनुसार, मध्य पाकिस्तानात शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.

Bomb blast in shia muslim procession in pakistan  many wounded | पाकिस्तानात शिया मुस्लिमांच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोट, तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

पाकिस्तानात शिया मुस्लिमांच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोट, तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Next

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलनगर येथे गुरुवारी मोठा स्फोट झाला. शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या कडेला हा स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. (Bomb blast in shia muslim procession in pakistan many wounded)

माध्यमांतील वृत्तांनुसार, मध्य पाकिस्तानात शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंत, स्फोटात जखमी झालेले लोक रस्त्याच्या कडेला बसून मदतीची वाट पाहत असल्याचे दिसते. 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले,"अफगाण सरकार तालिबान विरोधात अपप्रचार करत होतं"

बॉम्ब स्फोटाची पुष्टी -  
शहर पोलीस अधिकारी मोहम्मद असद आणि शिया नेता खावर शफाकत यांनी या स्फोटांना दुजोरा दिला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, शहरातील तणाव लक्षणीय वाढला आहे. शिया समाज हल्ल्यानंतर बदला घेण्याची मागणी करत आहे. तसेच, शिया नेते खावर यांनी म्हटले आहे, की शिया समुदायाची मिरवणूक मुजाहीर कॉलनीच्या गर्दीच्या भागातून निघत असताना हा हल्ला झाला. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घालतात तालिबानी; जीव वाचलेल्या महिलेनं सांगितली आपबिती

याच बरोबर, सरकारने अशा मिरवणुकांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात यावी, असे आवाहन खावर यांनी केले आहे. या भागातील दळणवळण सेवा आधीच बंद आहेत. अशौरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच येथील फोन सेवा बंद करण्यात आली आहे. 
 

Web Title: Bomb blast in shia muslim procession in pakistan  many wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.