गोठविलेल्या गर्भाशयातून बाळाचा जन्म

By admin | Published: June 10, 2015 11:56 PM2015-06-10T23:56:53+5:302015-06-10T23:56:53+5:30

वयाच्या १३ व्या वर्षी गर्भाशयाच्या गोठविलेल्या उतीच्या साहाय्याने आता २८ वर्षांची असलेली माता मुलाला जन्म देत असून जगात अशी प्रसूती प्रथमच होत आहे

The baby is born from the frozen uterus | गोठविलेल्या गर्भाशयातून बाळाचा जन्म

गोठविलेल्या गर्भाशयातून बाळाचा जन्म

Next

ब्रुसेल्स : वयाच्या १३ व्या वर्षी गर्भाशयाच्या गोठविलेल्या उतीच्या साहाय्याने आता २८ वर्षांची असलेली माता मुलाला जन्म देत असून जगात अशी प्रसूती प्रथमच होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ही क्रांती मानली जात असून जर्नल ह्यूमन रिप्रोडक्शनमध्ये प्रसिद्ध झालेल्या शस्त्रक्रियेने तरुण वयात कर्करोग झालेल्या व त्यानंतर घेण्यात येणाऱ्या केमोथेरपीमुळे गर्भाशयाचे नुकसान झालेल्या महिलांना नवा आशेचा किरण दाखवला आहे.
ब्रुसेल्स येथील इरास्मूस रुग्णालयातील गायनाकॉलॉजिस्ट डॉ. इसाबेल देमीस्तरे यांनी १५ वर्षांपूर्वी गोठविलेले अंडाशय महिलेत प्रत्यारोपित केले. ही मुलगी १३ वर्षाची असताना अंडाशय गोठविण्यात आले होते. त्यावेळी ती वयात आलेली होती की नव्हती ही बाब येथे स्पष्ट करण्यात आलेली नाही. रुग्ण महिला रिपब्लिक आॅफ कांगोमध्ये जन्मली असून, ११ वर्षांची असताना ती बेल्जियममध्ये गेली. तिला सिकल सेल अ‍ॅनिमिया झाल्यानंतर भावाच्या बोनमॅरोने जीवदान दिले आहे. या प्रक्रियेत केमोथेरपीचे उपचार द्यावे लागतात. केमोथेरपीमुळे शरीर बोनमॅरो नाकारत नाही. ती १४ वर्षांची होण्याआधी डॉक्टरांनी तिच्या अंडाशयाची उजवी बाजू काढली व ती गोठविण्यात आली. यानंतर तिला मासिक पाळी आली नाही. पण तारुण्याची इतर लक्षणे जाणवू लागली. ती १५ वर्षाची झाल्यानंतर डॉक्टरांनी हार्मोन उपचार चालू केले. १० वर्षांनंतर तिने स्वत:चे कुटुंब सुरू करण्याचा विचार केला. त्यानंतर डॉ. इसाबेल देमीस्तरे यांनी तिच्यावर उपचार सुरू केले व तिच्यावर गोठविलेल्या अंडाशयाचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली व दोन वर्षांनंतर ती गर्भवती राहिली. गेल्या नोव्हेंबर महिन्यात तिने निरोगी बाळाला जन्म दिला आहे. तिचे अंडाशय पुन्हा काम करेनासे झाले तर तिच्यावर पुन्हा एकदा अंडाशयाच्या तुकड्याचे प्रत्यारोपण केले जाईल व तिला आणखीही मुले होऊ शकतील.

Web Title: The baby is born from the frozen uterus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.