Aeromexico plane crash : एरोमॅक्सिको विमानाचा अपघात, प्रवासी सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 03:55 AM2018-08-01T03:55:29+5:302018-08-01T03:56:47+5:30

मॅक्सिकोमध्ये एरोमॅक्सिको विमानाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान, या अपघातानंतर विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.  

Aeromexico flight with 101 people on board crashes in Durango | Aeromexico plane crash : एरोमॅक्सिको विमानाचा अपघात, प्रवासी सुखरुप

Aeromexico plane crash : एरोमॅक्सिको विमानाचा अपघात, प्रवासी सुखरुप

Next

मॅक्सिको : मॅक्सिकोमध्ये एरोमॅक्सिको विमानाचाअपघात झाल्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान, या अपघातानंतरविमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील भागात असलेल्या डुरांगोमध्ये एरोमॅक्सिको विमानाचा अपघात झाला. या विमानात 94 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथकाने धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले. दरम्यान, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे येथील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर, येथील मीडियाच्या माहितीनुसार, या अपघातात 85 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 


डुरांगोहून मॅस्किकोला जात असताना एरोमॅस्किको (AM 2431) विमानाचा अपघात झाला. येथील स्थानिक वेळेनुसार सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच हा अपघात घडला.




 

Web Title: Aeromexico flight with 101 people on board crashes in Durango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.