विद्युत जोडणी प्रकरणात कारवाईच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:40 PM2018-05-25T23:40:40+5:302018-05-25T23:40:40+5:30

विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यानी अवैध विद्युत जोडणी पकडल्यानंतरही दोन दिवस हे प्रकरण थंडावले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली असून, आता एका प्रकरणात कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कावरवाई तर दुसºया प्रकरणात दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

 Movement of action in the case of electrical connection | विद्युत जोडणी प्रकरणात कारवाईच्या हालचाली

विद्युत जोडणी प्रकरणात कारवाईच्या हालचाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यानी अवैध विद्युत जोडणी पकडल्यानंतरही दोन दिवस हे प्रकरण थंडावले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली असून, आता एका प्रकरणात कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कावरवाई तर दुसºया प्रकरणात दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
एकीकडे गोरगरिबाने विद्युत मीटरचे बिल भरण्यास जराही विलंब केला तर त्याची विद्युत जोडणी खंडित केली जाते. त्यातच एखाद्याचा आकडा पकडल्यावर तर काही खैरच नाही. मात्र एखाद्या व्यावसायिक ठिकाणी अवैध जोडणी पकडली आणि तीही स्वत: अधीक्षक अभियंत्यानी पकडल्यास यात वेळीच कारवाई होण्याची अपेक्षा होती. मात्र अजून तरी तसे काहीच झाले नाही. या प्रकरणी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले चौकशी सुरु आहे. मात्र चूक तर आमच्याच कर्मचाºयाची आहे. त्यामुळे प्रथम त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. नंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल. तर कपड्याच्या दुकानातील मीटर बदलीचेही प्रकरण चांगलेच गंभीर आहे. त्या दुकानादाराने नेमके मीटर कोणत्या कारणामुळे बदलले त्याचेही अद्याप कारण समजलेले नाही.
त्यामुळे नियमानुसार संबंधित ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. शहरातील या दोन्ही घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे. तर दोन्ही प्रकरणात होणाºया कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारवाई करण्यासाठी महावितरण कंपनीने आता कंबर कसली असली तरीही त्यात येणाºया अडचणींवर ते कशी मात करणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. कारवाई न झाल्यास इतरांचे मनोबल मात्र वाढणार आहे.
कारवाईचे निवेदन
४यात प्रकरणात व्यावसायीक दुकानात अवैध विद्युत जोडणी ही आर्थिक व्यवहारातून झाल्याने संबंधित अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना बहुजन संघर्ष मित्र मंडळच्या वतीने दिले. निवेदनावर योगेश नरवाडे, विक्की काशिदे, विक्की खंदारे, निखिल कवाने, बंटी कुटे, मयूर नरवाडे, विशाल दुधमल, विनोद ठोके, शुभम पाईकराव आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title:  Movement of action in the case of electrical connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.