कोंढुरात अग्नितांडव; दोन गोठे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:13 AM2019-03-29T00:13:26+5:302019-03-29T00:14:05+5:30

कोंढूर गावात २८ मार्च रोजी भर दुपारी उन्हाच्या काळात अग्नितांडव घडले. अचानक लागलेल्या आगीत एक घर व दोन गोठे जळून खाक झाले. ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे हा अग्निपात शांत करता आला.

 Kondhurat Agniandav; Two cowshed | कोंढुरात अग्नितांडव; दोन गोठे खाक

कोंढुरात अग्नितांडव; दोन गोठे खाक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : कोंढूर गावात २८ मार्च रोजी भर दुपारी उन्हाच्या काळात अग्नितांडव घडले. अचानक लागलेल्या आगीत एक घर व दोन गोठे जळून खाक झाले. ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे हा अग्निपात शांत करता आला.
कळमनुरी तालुक्यातील कोंढुर गावात २८ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान अचानक एका घराला व दोन गोठ्याला आग लागली. आग कशी लागली व कुठे लागली, हे लक्षात येईपर्यंत आगीचा मोठा भडका उडाला होता. गावातील रामचंद्र तुकाराम थोरात यांचे घर तर त्र्यंबक गणेशराव पतंगे व चिंतामणी गणेशराव पतंगे यांचे जनावरे बांधण्याचे गोठे आगीत जळून खाक झाले.
ग्रामस्थांनी धावाधाव करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. बोअर व विहिरीचे पाणी टाकून आग विझवली. आग विझवण्याच्या शेवटच्या टप्प्यात अग्निशमन दल कळमनुरी येथून हजर झाले. यामध्ये एक घर व दोन गोठे जळून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. परंतु महसूल विभागातर्फे हे वृत्त लिहीपर्यंतही पंचनामा न झाल्यामुळे नुकसानीचा आकडा कळू शकला नाही. ग्रामस्थांनी मोठी धावपळ केल्यामुळे अग्नितांडव शमवून मोठा अनर्थ टळला आहे.

Web Title:  Kondhurat Agniandav; Two cowshed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.