हिंगोलीतील कचरा उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:42 PM2017-12-14T23:42:45+5:302017-12-14T23:42:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : येथील पालिकेने शहरातील सफाईकडे लक्ष केंद्रित केले असून, गल्लीबोळातील कचरा उचलण्याची व्यवस्था केली आहे. ...

Hingoli will pick up garbage | हिंगोलीतील कचरा उचलणार

हिंगोलीतील कचरा उचलणार

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छ शहर : घंटागाडी, सायकल रिक्षे, ट्रॅक्टर शहरात फिरणार

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील पालिकेने शहरातील सफाईकडे लक्ष केंद्रित केले असून, गल्लीबोळातील कचरा उचलण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी तीन वर्षांचा करार अमरावती येथील संस्थेशी केला असून, शहरातील कचरा गोळा केला जाणार आहे.
हिंगोली शहरात १४ डिसेंबर रोजी न. प. अध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीचा शुभारंभ केला. पालिकेने स्वच्छतेवर सर्वाधिक भर दिला जात आहे. आता शहराची स्वच्छता करण्यासाठी अमरावती येथील बेरोजगाराची क्षितीज नागरीक सेवा सहकारी संस्थेला तीन वर्षांचा करार केला आहे. यामध्ये २० घंटागाड्या, १६ सायकल रिक्षे आणि २ ट्रॅक्टर शहरभर फिरुन गल्लीबोळातून कचरा गोळा करणार आहेत. एवढेच काय, तर ज्या ठिकाणी वाहन जाणार नाही त्या ठिकाणचा कचरा आणण्यासाठी सायकल रिक्षाचीही व्यवस्था केली आहे. गुरुवारी या कचरा गाड्यांचे उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी शहरात १० ट्रॅक्टर, १० घंटागाडी, २ टिप्पर आणि २ जेसीबीच्या साह्याने कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शहरातून उचलणाºया कचºयावर प्रक्रिया करुन गांडूळ खताची निर्मित्ती करण्याचाही करार उगम सेवाभावी संस्थेसोबत तीन वर्षासाठी केला. दोन ते तीन महिन्यांत गांडूळ खत शेतकºयांना शासकीय दाराने उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
शहरातील नगरपालिकेत घंटागाडीचा शुभारंभ सोहळा नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील, गटनेते निहाल भैय्या, नगरसेवक श्रीराम बांगर, बिरजु यादव, जगजित खुराणा, गणेश लुंगे, अनिता सूर्यतळ, जितसिंग शाहू, उमेश गुठ्ठे, नाना नायक, गणेश बांगर, शकील भाई, कय्युम खॉ, बंडू कुटे, राम कदम, संदीप मुदिराज, आमिर अली, अनिल नैनवाणी, दिनेश चौधरी, जावेदराज, आनंदा खंदारे, माबुद बागवान, गोपाल अग्रवाल, आरेफलाला, आरेफ भाई, धबाले, राजेश गोटे, मनीष राठोड, बाळू बांगर आदी उपस्थित होते. तसेच पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. यावेळी त्यांना स्वच्छता मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल- पाटील
४शहरतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. कचरा रस्त्यावर टाकू नये, यासाठी पालिकेने १०० कचरा पेट्यांची व्यवस्था केली असून, त्यापैकी ३० कचरा पेट्या उपलब्ध झाल्या आहेत. शहरात फेरी मारून कचरा गोळा केला जाईल. यासाठी मोबाईल अ‍ॅपची देखील सुविधा आहे. पालिकेने शहर स्वच्छतेच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. याकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाºयांवर कारवाई करून दंड आकारला जाईल असे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले.

Web Title: Hingoli will pick up garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.