हळदीच्या वाहनांच्या हिंगोली मोंढ्यात रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:13 AM2018-05-17T00:13:03+5:302018-05-17T00:13:03+5:30

जिल्ह्यासह परजिल्ह्यातही प्रसिद्ध हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. यंदा हळदीची आवक वाढण्यास प्रारंभ झाला असून बुधवारी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास ३६५ वाहनांतून ७ ते ८ हजार क्विंटल हळद विक्रीस आल्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत या मालाची मोजणीच चालणार आहे.

Hingoli hinges of turmeric vehicles | हळदीच्या वाहनांच्या हिंगोली मोंढ्यात रांगा

हळदीच्या वाहनांच्या हिंगोली मोंढ्यात रांगा

googlenewsNext
ठळक मुद्देसात ते आठ हजार पोत्यांची आवक : भावही सर्वसाधारणच, खरिपाच्या तोंडावर विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यासह परजिल्ह्यातही प्रसिद्ध हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. यंदा हळदीची आवक वाढण्यास प्रारंभ झाला असून बुधवारी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास ३६५ वाहनांतून ७ ते ८ हजार क्विंटल हळद विक्रीस आल्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत या मालाची मोजणीच चालणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात सिंचनाच्या पट्ट्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हळदीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. काही दिवसांपासून हळदीच्या भावात हजार रुपयांच्या पटीत चढ उतार होत आहे. त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. भाव वाढले म्हणून बाजारात हळद आणली की, भाव घसरत आहेत.
बुधवारी हळदीचे बिट होणार असल्याचा संदेश शेतक-यांना मिळाल्यामुळे मंगळवारी रात्रीच अनेकांनी वाहने भरून आणली. मात्र त्यांना मोंढ्यात जावू दिले जात नाही. बुधवारी सकाळपासून नाव व वाहन नोंंदणी केल्यानंतर आत सोडण्यास प्रारंभ झाला. जवळपास ३६५ वाहनांची नोंद झाली होती. या सर्व वाहनांतील मिळून सात ते आठ हजार क्विंटल माल असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या मालाचे बिट दुपारनंतर सुरू झाले. आज साडेसहा ते साडेसात हजारांपर्यंतचा भाव शेतकºयांना मिळाला एकाच दिवसात मालाचे बिट होणेच शक्य नाही. काही मालाची बिट उद्या करावी लागणार आहे. तर बाजार समितीत अडीच ते तीन हजार क्विंटल मालाच्या मोजणीचीच प्रक्रिया एका दिवसात करणे शक्य असल्याने शुक्रवारपर्यंत मोजणी चालू शकते. त्यामुळे काही शेतकºयांना दोन दिवसांचा मुक्काम करणे क्रमप्राप्त आहे.

...तर बिट सोमवारी
आगामी खरीप पेरण्यांच्या पार्श्वभूमिवर हळदीची आवक वाढत आहे. मात्र शुक्रवारपर्यंत आजच्या हळदीचीच मोजणी झाल्यास पुढील सोमवारीच पुढचे बिट होईल, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.
तुरीची खाजगी विक्री : आवक तिप्पट
नाफेडच्या हमीभाव केंद्रावर तुरीची खरेदी करणे बंद झाल्याची वार्ता येताच शेतकºयांनी खाजगी बाजारात तुरीची विक्री करण्यासाठी आज घाई केल्याचे चित्र होते. बोनससह नाफेडचा दर ५४00 रुपये एवढा पडत असताना खाजगी बाजारात मात्र तूर ३९00 ते ४१५0 रुपयांपर्यंत तूर शेतकºयांना विकावी
लागली. जवळपास हजार ते दीड हजार क्विंटल तुरीची आवक झाल्याचा अंदाज आहे. शेतकºयांना तुरीमागेही हजारांचा फटका बसत असून हमी भाव केंद्रावर तूर येत नसल्याचे सांगणाºयांनी ही तूर कुठून येत आहे, याचे रहस्य उलगडण्याची गरज आहे.

‘कमी दर मिळालेल्या शेतकºयांना अनुदान द्या’
हिंगोली : शासनाने स्थापन केलेल्या हमीभाव केंद्रावर माल विकू न शकलेल्या शेतकºयांना किमान आधारभूत किमतीपेक्षाही हजार ते दीड हजार रुपये कमी भावाने माल विकावा लागला. अशांना सरसकट प्रतिक्विंटल हजार रुपये अनुदान देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तूर ५४५0, चना-४४00 तर सोयाबीनला ३२५0 रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला होता. मात्र नाफेडच्या दिशाहीन धोरणामुळे शेतक-यांचा मालच पूर्णपणे खरेदी केला गेला नाही. हजारो शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत कमी भावाने माल विकावा लागला. त्यांना अनुदान देण्याची मागणी आम आदमी पार्टीचे गोपाल ढोणे, राजीव पवनकर, पांडुरंग कान्हे, दुर्गादास खर्जुले, गजानन हाके, नंदकिशोर अग्रवाल आदींनी केली.

Web Title: Hingoli hinges of turmeric vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.